लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या आठ महिन्यापासून पोलिसांच्या नजरेत फरार असलेले भाजपा नेते मुन्ना यादव यांचा भाऊ बाला यादव याच्याकडून एका महिलेला शिवीगाळ करून धमकाविण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ही घटना बुधवारी सकाळी बजाजनगर ठाण्यांतर्गत लक्ष्मीनगर परिसरातील आठ रस्ता चौकात घडली. बजाजनगर पोलिसांनी अदखलपात्र प्रकरण म्हणून नोंद केल्याने पीडित महिलेमध्ये पोलिसांप्रति रोष आहे.धंतोली येथील चुनाभट्टी परिसरात २१ आॅक्टोबर २०१७ रोजी कामगार मंडळाचे अध्यक्ष भाजपा नेते मुन्ना यादव व त्यांचे विरोधक मंगल यादव यांच्यात मारपीट झाली होती. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबाविरुद्ध खुनाचा प्रयत्न तसेच दंगा भडकविल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणानंतर मुन्ना यादव बराच काळ पोलिसांच्या हाती लागले नव्हते. याप्रकरणी गुन्हे शाखेला तपास देण्यात आला होता. मुन्ना यादव यांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयातून अंतरिम जामीन मिळविला होता. परंतु त्यांचा भाऊ बाला यादव हे फरार होता. मंगल यादवचा भाऊ अवधेश यादव याची पत्नी नविता बुधवारी सकाळी ११.१५ वाजता आठ रस्ता चौकातून आपल्या वाहनाने जात होती. नविताच्या तक्रारीनुसार ती चौकातील एका फरसाणच्या दुकानात मुलासाठी नाश्ता घेण्यास थांबली. याच वेळी नविताची नजर दोन मित्रांसोबत बसलेल्या मुन्ना यादव यांचा भाऊ बाला यादववर पडली. बाला यादव तिला बघून शिवीगाळ करू लागला.ती परत वाहनात बसली. तिने नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. याचदरम्यान बाला यादव शिवीगाळ करीत नविता यांच्या वाहनाकडे आला. तितक्यात बजाजनगर ठाण्यातील पोलीस पथक घटनास्थळी पोहचले. पोलिसांना बघून बाला यादव सतर्क झाला. नविताच्या नुसार त्याने पोलिसांना शिवीगाळ करीत दुचाकी वाहनावर फरार झाला. नविता लगेच बजाजनगर ठाण्यात पोहचली. त्यांनी याप्रकरणी पोलिसांना तक्रार दिली. पोलिसांनी शिवीगाळ व धमकविल्याबद्दल प्रकरण अदखलपात्र नोंदविले. या प्रकरणात गुन्हा नोंदवावा, अशी मागणी नविताने केली. पोलिसांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.पोलीस रेकॉर्डनुसार बाला यादव गेल्या आठ महिन्यापासून फरार आहे. तो खुलेआम शहरात फिरतो आहे. परंतु पोलीस त्याला पकडण्यास असमर्थ ठरत आहे. नविता यांनी यापूर्वीही पोलिसांना बाला यादव याची सूचना दिली होती. त्यावेळी तो पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता.- पोलिसांची भूमिका नेहमीच संदिग्धनविता यादव यांनी बाला यादव उभा असल्याची व्हिडीओ क्लिप बनविली आहे. बालाने तिला क्लिपिंग बनवीत असताना बघितले होते. त्यामुळे तो संतापला होता. परंतु या घटनेमुळे शहर पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीपासूनच संदिग्ध भूमिका घेतली होती. ं
फरार भाजपा नेता मुन्ना यादवच्या भावाची महिलेला धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:31 AM
गेल्या आठ महिन्यापासून पोलिसांच्या नजरेत फरार असलेले भाजपा नेते मुन्ना यादव यांचा भाऊ बाला यादव याच्याकडून एका महिलेला शिवीगाळ करून धमकाविण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. ही घटना बुधवारी सकाळी बजाजनगर ठाण्यांतर्गत लक्ष्मीनगर परिसरातील आठ रस्ता चौकात घडली. बजाजनगर पोलिसांनी अदखलपात्र प्रकरण म्हणून नोंद केल्याने पीडित महिलेमध्ये पोलिसांप्रति रोष आहे.
ठळक मुद्देलक्ष्मीनगरातील घटना : पोलिसांनी नोंदविले अदखलपात्र प्रकरण