मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही प्रचार-प्रसार नाही : विदर्भातील भाजपा नेते शांत नागपूर : एरवी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते ‘सोशल मीडिया’वर प्रचंड सक्रिय दिसतात. पक्षाच्या विविध योजनांचा प्रसार करणारे मेसेज झपाट्याने फॉरवर्ड करतात. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी दिलेल्या ऐतिहासिक कर्ज माफीचा प्रचार-प्रसार भाजपाकडून त्या प्रमाणात होताना दिसत नाही. घोषणेनंतरचा एक दिवस सोडला तर नंतर मात्र भाजपाने या विषयच सोडून दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या कर्जमाफीचे ‘क्रेडिट’ भाजपाच्या खात्यात जमा होईल की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. कर्जमाफीच्या सुरुवातीला अनेकांनी स्वत:चे‘पोस्टर्स’ लावून घेतले, मात्र प्रत्यक्ष कर्जमाफीच्या ‘क्रेडिट’साठी भाजपा नेते उदासीन कर्जमाफीचे निकष आणि अटी व त्यातून होणारे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगण्याबाबत ही मंडळी का उदासीन आहे, असा प्रश्न भाजपाच्या अंतर्गत वर्तुळातच विचारला जात आहे. कार्यकर्त्यांच्या या उदासीनतेमुळे पक्षश्रेष्ठीही अस्वस्थ झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात होर्डिंग्ज विदर्भात मात्र उदासीनता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर, विदर्भातील आहेत. असे असले तरी त्यांनी कर्जमाफी करताच पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानणारे, त्यांना श्रेय देणारे मोठमोठे होर्डिंग्ज लावले. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या सर्व महामार्गांवर मोठमोठे होर्डिंग्ज अजूनही पहायला मिळतात. याउलट विदर्भातील भाजपा नेत्यांनी मात्र आपल्याच मुख्यमंत्र्यांचे कौतुक करण्यात कंजुषी केल्याचे चित्र आहे. एखादा अपवाद वगळता महामार्गांवर, तालुक्याच्या ठिकाणी असे स्थायी होर्डिंग्ज लागलेले नाहीत. कर्जमाफीचे निकष आणि अटी व त्यातून होणारे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगण्याबाबत ही मंडळी का उदासीन आहे, असा प्रश्न भाजपाच्या अंतर्गत वर्तुळातच विचारला जात आहे. कार्यकर्त्यांच्या या उदासीनतेमुळे पक्षश्रेष्ठीही अस्वस्थ झाले आहेत.
कर्जमाफीच्या ‘क्रेडिट’साठी भाजपा नेते उदासीन
By admin | Published: July 01, 2017 1:51 AM