योगेश पांडे
नागपूर : केरळमधील कन्नूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्याबाबत संघाने मौन राखले आहे. मुख्यालयाचे ठिकाण असून संघातर्फे कुठलीही निंदा करण्याचे टाळण्यात आले आहे. परंतु भारतीय जनता युवा मोर्चातर्फे बुधवारी निषेध आंदोलन करण्यात आले.
नागपुरात भारत माता चौक येथे भाजयुमोतर्फे शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांच्या नेतृत्वात भर पावसात केरळ सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी हल्ला करणाऱ्यांचा निषेध करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. केरळमध्ये जाणूनबुजून संघ स्वयंसेविकांना टार्गेट करण्यात येत असून केंद्राने यात दखल घ्यावी अशी भूमिकादेखील मांडण्यात आली.
यावेळी भाजयुमोचे प्रदेश सचिव राहुल खंगार, सचिन करारे, दिपांशु लिंगायत, अमोल तिडके, मनिष मेश्राम, बादल राऊत, निलेश राऊत, पंकज सोनकर, सचिन सावरकर, प्रसाद मुजुमदार, मनमित पिल्लारे, गौरव हरडे, रितेश पांडे, अक्षय ठवकर, अथर्व त्रिवेदी, रितेश पांडे, अनुप साळवे, राहुल वाटकर, रोहीत सहारे, समीर मांडले, अमित पांडे, हर्ष डोर्लिकर इत्यादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.