राहुल गांधींविरोधात भाजपचे नागपुरात आंदोलन

By योगेश पांडे | Published: February 9, 2024 05:31 PM2024-02-09T17:31:35+5:302024-02-09T17:32:26+5:30

कॉंग्रेस ओबीसीविरोधी, पटोले-वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा; भाजप प्रदेशाध्यक्षांचे टीकास्त्र

bjp protest against rahul gandhi in nagpur | राहुल गांधींविरोधात भाजपचे नागपुरात आंदोलन

राहुल गांधींविरोधात भाजपचे नागपुरात आंदोलन

योगेश पांडे, नागपूर : कॉंग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भातील वक्तव्यावरून भाजपने नागपुरात शुक्रवारी सकाळी आंदोलन केले. यावेळी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. राहुल गांधी वारंवार ओबीसीविरोधी वक्तव्ये करत असून पक्षाची भूमिकाच ते मांडत आहेत. आता तरी नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांनी राजिनामा द्यावा असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केले.

नागपुरमध्ये राहुल गांधींविरोधात संविधान चौकात भाजपने सकाळी आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केले. त्यानंतर भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक पुतळा जाळला. राहुल गांधी यांनी माफी न मागितल्यास राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
राहुल गांधी संपूर्ण देशातील ओबीसी समाजाचा वारंवार अपमान करीत आहेत. आणि, त्यांच्या पक्षातील ओबीसी नेते म्हणविणारे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गप्पगार आहेत. त्यांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करावा व पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. ओबीसी समाजाचा वारंवार होणार अपमान कधीही विसरता येणार नाही, असे बावनकुळे यावेळी म्हणाले. शनिवारी राज्यभरातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

या आंदोलनात आ. कृष्णा खोपडे, आ. समीर मेघे, आ. टेकचंद सावरकर, आ. प्रवीण दटके, ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉ. आशिष देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, नागपूर शहराध्यक्ष बंटी कुकडे, नागपूर जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, अनुराधा अमीन, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे, गिरीश व्यास, मल्लिकार्जून रेड्डी, बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम, अशोक धोटे, अर्चना डेहनकर, बाल्या बोरकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष फुटाने, कार्याध्यक्ष रोहीत पारवे, किशोर रेवतकर, दिनेश ठाकरे, रोहित मुसळे, महेश दिवसे, दिलेश ठाकरे, डॉ. प्रिति मानमोडे, नरेश मोटघरे, जयप्रकाश गुप्ता, श्रद्धा पाठक, नरेंद्र धनोले यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा व भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: bjp protest against rahul gandhi in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.