नागपुरात भाजपने केला राहूल गांधी यांचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 11:32 PM2019-11-16T23:32:47+5:302019-11-16T23:33:44+5:30
राहुल गांधींनी देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी अनिल सोले, प्रवीण दटके व धर्मपाल मेश्राम आदींनी आपल्या भाषणातून केली. यावेळी काँग्रेस विरोधात नारेबाजी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या सुरक्षेसाठी खरेदी करण्यात आलेल्या राफेल विमानासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अप्रत्यक्षरीत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याची संधी सोडली नाही. खोटी विधाने करून गांधी यांनी देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांना न्यायालयाने अवमानाची नोटीस पाठविली. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. जाहीर सभा आणि संसदेत अशाप्रकारे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी शनिवारी भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, आमदार प्रा. अनिल सोले, यांच्या नेतृत्वात संविधान चौकात निषेध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राहुल गांधींनी देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी अनिल सोले, प्रवीण दटके व धर्मपाल मेश्राम आदींनी आपल्या भाषणातून केली. यावेळी काँग्रेस विरोधात नारेबाजी करण्यात आली.
यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपातील सत्तापक्षनेते संदीप जोशी,स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहणे,आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, सभापती संदीप जाधव, दिलीप दिवे,माजी महापौर अर्चना डेहणकर, किशोर पलांदूरकर, भोजराज डुंबे, शिवानी दाणी, रमेश भंडारी, महेंद्र राऊत, दिलीप गौर, किशन गावंडे, मनीषा काशीकर, सुभाष पारधी, डॉ. रवींद्र भोयर, डॉ. कीर्तिदा अजमेरा. चेतना टांक, रूपा रॉय, प्रगती पाटील, बंटी कुकडे, किशोर वानखेडे, चंदन गोस्वामी, मनीष मेश्राम, नाना उमाटे, गुड्डू खान, सुधीर श्रीवास्तव, रंजन माझी, अनिल साहू, विजय गुप्ता, किशोर पेठे, विंकी रुघवानी, रमेश वानखेडे, लाला कुरेशी, दीपक अरोरा, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.