लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चीनकडून सीमेवर करण्यात आलेल्या भ्याड कृत्याचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे बुधवारी निषेध करण्यात आला. ‘कोरोना’ची स्थिती लक्षात घेता ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळून पाच पाच कार्यकर्त्यांनी शहरातील सहा मंडळातील चौकांमध्ये चीनचा झेंडा जाळला. चीनने जे भ्याड कृत्य केले आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आणि जे सैनिक शहीद झालेले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. दीपांशू लिगायत यांच्या नेतृत्वात मध्य नागपुरात, सचिन करारे यांच्या नेतृत्वात पूर्व नागपुरात, वैभव चौधरी यांच्या नेतृत्वात दक्षिण नागपुरात, आलोक पांडे यांच्या नेतृत्वात उत्तर नागपुरात, सारंग कदम यांच्या नेतृत्वात दक्षिण-पश्चिम नागपुरात आणि कमलेश पांडे यांच्या नेतृत्वात पश्चिम नागपुरात आंदोलन करण्यात आले.चीनच्या हिंसक कृत्याचा संघाकडून निषेधलडाखच्या गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या भ्याड कृत्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून निषेध करण्यात आला आहे. यासंदर्भात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी संयुक्त पत्रक जारी केले आहे.देशाचे सार्वभौमत्व, अखंडता व आत्मसन्मानासाठी सीमेचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान देऊन वीरगतीला प्राप्त झालेल्या वीर जवानांना नमन करतो. सैनिकांच्या कुटुंबीयांप्रति देशवासीयांकडून सांत्वना प्रकट करतो. चीनचे सरकार व सैन्याच्या या आक्रमक व हिंसक कृत्याची आम्ही निंदा करतो. या संकटाच्या काळात आम्ही सर्व नागरिक सैन्य व सरकारसमवेत आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक व सरकार्यवाह यांनी केले आहे.
नागपुरात भाजयुमोतर्फे चीनचा झेंडा जाळून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 1:33 AM