शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

साई मंदिरावर भाजपचे गुलाब फुलले

By admin | Published: January 04, 2016 5:04 AM

वर्धा मार्गावरील साई मंदिराचा कारभार बघण्यासाठी गठित करण्यात आलेल्या श्री साईबाबा सेवा मंडळाच्या विश्वस्त

नागपूर : वर्धा मार्गावरील साई मंदिराचा कारभार बघण्यासाठी गठित करण्यात आलेल्या श्री साईबाबा सेवा मंडळाच्या विश्वस्त पदासाठी रविवारी पार पडलेल्या चुरशीच्या निवडणुकीत भाजपचे डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर यांच्या गुलाब पॅनलने सर्व ११ जागावर विजय मिळविला आहे. निवडणुकीत श्री साई भक्त -साई सेवक, गुलाब तसेच बाबासाहेब उत्तरवार अशा प्रमुख तीन पॅनलसह अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याने विश्वस्तपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. रविवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात मतदानानंतर मतमोजणी करण्यात आली. विश्वस्त मंडळाच्या ११ सदस्यांपैकी भोयर यांच्या पॅनलचे संरक्षक सदस्य गटातून प्रभाकर मुंडले तर आजीवन सदस्य गटातून राजेंद्र दांडेकर व प्रताप रणनवरे हे आधीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. साधारण गटातील आठ सदस्यांसाठी मतदान घेण्यात आले. तीन पॅनलचे उमेदवार व पाच अपक्ष असे २४ साईभक्त निवडणुकीच्या मैदानात होते. परंतु सर्व आठ जागावर भोयर यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी, अनिवाश शेगांवकर (३५०), नगरसेवक डॉ. रवींद्र ऊर्फ छोटू भोयर (४१०), मुन्ना यादव (३५८), कैलास जोगानी (३६४), घनश्याम राठी (३४५), राजेन्द्र देशमुख (३४८), सुधीर दफ्तरी (३४५) व महेश टेंभरे (३४५ ) आदींचा समावेश आहे. ६८१ मतदारापैकी ६२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ९३ टक्के मतदान झाले. यातील ६ मते अवैध ठरली. धर्मादाय आयुक्त मंगला कांबळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. साई मंदिरावरील सत्तेसाठी सर्वच पॅनलने आपली शक्ती पणाला लावली होती. मंदिराची सुरक्षा, आर्थिक व्यवहारात पारदर्शता व भ्रष्टाचाराला विरोध आणि विकास अशा मुद्यावर ही निवडणूक लढवण्यात आली. (प्रतिनिधी)संघटितपणाचा विजयसंघटितपणे निवडणुकीला सामोरे गेल्याने आमच्या पॅनलचा विजय झाला. साई मंदिर देवस्थानला विदर्भातील एक अग्रणी देवस्थान बनविण्याचा संकल्प आहे. येथे पार्किंग सुविधा व इतर आवश्यक विकास कामे करण्याचा प्रयत्न राहील. ७ जानेवारी पूर्वी कार्यकारिणीची घोषणा होण्याची शक्यता आहे.-छोटू भोयर