एससी,एसटी,ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 09:11 PM2020-02-24T21:11:05+5:302020-02-24T21:12:24+5:30

आरएसएस व भाजप हे आरक्षणविरोधी असून संविधानाने दिलेले एससी,एसटी ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजप सरकार अमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप करीत काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

BJP, RSS to end SC, ST, OBC reservations | एससी,एसटी,ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव 

एससी,एसटी,ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा भाजप-आरएसएसचा डाव 

Next
ठळक मुद्देकाँग्रेसचा आरोप : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरएसएस व भाजप हे आरक्षणविरोधी असून संविधानाने दिलेले एससी,एसटी ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा आरएसएसचा विचार केंद्रातील भाजप सरकार अमलात आणण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप करीत काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
नागपूर शहर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्यावतीने शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात ओबीसी विभागाचे अध्यक्ष चंद्रकांत हिंगे, व एससी विभागाचे अध्यक्ष वासुदेवराव ढोके, डॉ.मनोहर तांबुलकर,विजय वनवे,रत्नाकर जयपूरकर,चंद्रकांत बडगे, राजेंद्र ठाकरे, प्रकाश बांते, देवेंद्र माने, राजाभाऊ चिलाटे, राजेद्र कुथे, दिवाकर हलमारे,चंदु वाकोडकर, नागले, उषा रोकडे, सुनील दहीकर, सुनिता जिचकार, राजेश राहाटे, अरुण पाठमासे, शांतनू जिचकार, चेतन तराळे, अरुणा सेलवटकर, उषा बोरकर, शालिनी तरोडे, गजाजन देऊळकर,दिनेश वाघमारे,कुंदा हरडे, अ‍ॅड. अभय रणदिवे, इर्शाद मलिक, रेश्मा नंदागवळी, धरम पाटील, अब्दुल शकील, छबीलाल राहगडाले, नाना जांबुलकर, अविनाश घंगारे, वामनराव टिचकुले, पुंडलिक संभे,प्रणित मोहोड,नीरज देशमुख,विश्वनाथ देशमुख, धनराज उज्जैन,नंदा देशमुख , एससी विभागाचे प्रदीप बरगट,जिजोबा पारधी,नरेश खडसे,राजेश काबळे, बॉबी दहीवले,उमेश भिवगडे,विजय इंगोले,सुभाष पेढारकर,संतोष शेवळे,अनिल पारटकर,भाऊराव कोकणे,अनिता हिंगणकर,विना कटारे,प्रफुल भाजे,जितेद्र तागडे,नितीन डोळीफोडे,अनिल आवळे,राजेश कांबळे,विपुल गजभियेसहित पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP, RSS to end SC, ST, OBC reservations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.