लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागरिकांना येत असलेल्या वाढीव वीजबिलाविरुद्ध भाजप रस्त्यावर उतरली आहे. पक्षाने सोमवारी शहरातील सहा मंडळांमध्ये निदर्शने करीत नागरिकांना वीजबिलात दिलासा देण्याची मागणी केली. यादरम्यान राज्य सरकार व राज्याच्या ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली.भाजपने शहरातील मंडळांतर्गत येणाऱ्या सब-स्टेशनमध्ये मागण्यांचे निवेदन सादर केले. लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून लोकांच्या हाताला काम नाही, असे यात म्हटले आहे. नोकरदार लोकांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने नागरिकांना दिलासा देण्याऐवजी एकाच वेळी तीन महिन्यांचे भरभक्कम वीज बिल पाठवून नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आठ ते दहा हजार रुपये कमावणाऱ्या व्यक्तीला १५ ते २० हजाराचे बिल पाठवण्यात आले आहे. वीज बिलाबाबत नागरिकांमध्ये असंतोष आहे. भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके आणि इतर आमदारांनी यावेळी म्हटले की, ऊर्जामंत्र्यांनी १०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी आपले आश्वासन पाळावे. नागरिकांना दिलासा न मिळाल्यास वीज बिलाची होळी करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.मंडळनिहाय आंदोलनमध्य मंडळ : तुळशीबाग सब-स्टेशनजवळ आंदोलन करण्यात आले. शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. विकास कुंभारे, मंडळ अध्यक्ष किशोर पलांदूरकर, बंडू राऊत, दीपराज पार्डीकर, सुभाष पारधी, पार्षद वंदना यंगटवार व श्रद्धा पाठक, अशफाक पटेल, दशरथ मस्के उपस्थित होते.दक्षिण पश्चिम : कांग्रेसनगर चौकात महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. माजी महापौर नंदा जिचकार, मंडळ अध्यक्ष किशोर वानखेडे, रमेश भंडारी, सतीश सिरसवान उपस्थित होते.पूर्व मंडळ : छापरूनगर चौकात आंदोलनामुळे रस्ता जाम झाला होता. खा. डॉ. विकास महात्मे, आ. कृष्णा खोपडे, प्रमोद पेंडके, उपमहापौर मनीषा कोठे, नगरसेवक बाल्या बोरकर, कांता रारोकर, धर्मपाल मेश्राम, बंटी कुकडे, मनोज चापले, मनीषा धावडे व चेतना टांक, संजय वाधवानी,हितेश जोशी,अशोक शनिवारे उपस्थित होते.उत्तर मंडळ : ऑटोमोटिव्ह चौकात झालेल्या आंदोलनात पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, वीरेंद्र कुकरेजा, संजय चौधरी, गोपी कुमरे, सुषमा चौधरी, माजी महापौर कल्पना पांडे, सुरेंद्र यादव उपस्थित होते.पश्चिम मंडळ : गिट्टीखदान, काटोल रोड येथे झालेल्या आंदोलनात आ. अनिल सोले व रामदास आंबटकर, माजी मंत्री परिणय फुके, माजी आमदार सुधाकर देशमुख, गिरीश देशमुख, संदीप जाधव, सुनील मित्रा, सुनील अग्रवाल, संजय बंगाले, भूषण शिंगणे, कीर्तिदा अजमेरा, सुनील हिरणवार, प्रमोद कोरती, विनोद कन्हेरे, प्रगती पाटील, शिल्पा धोटे, अर्चना पाठक, उज्ज्वला शर्मा उपस्थित होते.
दक्षिण मंडळ : तुकडोजी पुतळा चौक येथे झालेल्या आंदोलनात आ. मोहन मते व आ. नागो गाणार, देवेंद दस्तुरे, संजय ठाकरे, परशू ठाकुर, विजय चुटेले, मनीष मेश्राम उपस्थित होते.