लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अक्षयतृतीतेच्या पर्वावर भाजपाने पुव्हा एकदा हाती झाडू घेतला. गणेशपेठ परिसरातील बस स्थानकाची साफसफाई करून स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसर स्वच्छ केला.सकाळी ८ वाजता स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. नेते व कार्यकर्त्यांनी हाती झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. हे पाहून काही नागरिकही स्वयंस्फूर्तीने अभियानात सहभागी झाले. यावेळी सुधाकर कोहळे यांनी प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांनी नागरिकांना सोबत घेऊन आठवड्यातून एकदा स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन केले. अनिल सोले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांचे आरोग्य सुदृृढ रहावे यासाठी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली. प्रत्येक कार्यकर्ता व नागरिकाने आपल्या स्वभवातच स्वच्छतेची प्रेरणा घालून घ्यावी. तेव्हाच खऱ्या अर्थाने आपला देश व परिसर स्वच्छ व सुंदर होईल, असेही ते म्हणाले.यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष विक्की कुकरेजा,अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सुभाष पारधी, शहर उपाध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, संयोजक भोलानाथ सहारे, संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, भोजराज डुंबे, दिव्या धुरडे, डॉ. कीर्तिदा अजमेरा, बापू चिखले, संजय पेंशने, राम आकरे, श्रद्धा पाठक, रिता मुळे, हर्षा भोसले, किशोर पेठे, किशोर बागडे, दशरथ मस्के, शिवनाथ पांडे, कदिरभाई, अशफाक पटेल, राकेश गांधी, प्रसिद्धी प्रमुख, चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.
नागपुरात भाजपाने पुन्हा हाती घेतला झाडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 8:35 PM
अक्षयतृतीतेच्या पर्वावर भाजपाने पुव्हा एकदा हाती झाडू घेतला. गणेशपेठ परिसरातील बस स्थानकाची साफसफाई करून स्वच्छता अभियानाची सुरुवात करण्यात आली. शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिसर स्वच्छ केला.
ठळक मुद्दे बस स्टॅण्ड परिसर केला स्वच्छ : स्वच्छता अभियानाची सुरुवात