शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भाजपलाच मतदारांचा कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 12:04 AM

वानाडोंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला. पारशिवनीत शिवसेनेच्या प्रमिला कुंभलकर या विजयी झाल्या. तरीही बहुमत हे भाजपकडे आहे. वानाडोंगरीत भाजपने एकतर्फी २१ पैकी १९ जागांवर कब्जा मिळवित सर्वात मोठा पक्ष बनला. वानाडोंगरीच्या नगराध्यक्षपदावर भाजपच्या वर्षा शहाकार यांनी बाजी मारली. तेथे राष्ट्रवादी आणि अपक्षाला प्रत्येकी एक - एक जागा पदरात पाडून घेता आली.

ठळक मुद्देवानाडोंगरी नगर परिषद, पारशिवनी नगर पंचायतचा निकाल जाहीर : भाजपच्या पारड्यात ३८ पैकी ३० जागा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वानाडोंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी भाजपच्या बाजूने कौल दिला. पारशिवनीत शिवसेनेच्या प्रमिला कुंभलकर या विजयी झाल्या. तरीही बहुमत हे भाजपकडे आहे. वानाडोंगरीत भाजपने एकतर्फी २१ पैकी १९ जागांवर कब्जा मिळवित सर्वात मोठा पक्ष बनला. वानाडोंगरीच्या नगराध्यक्षपदावर भाजपच्या वर्षा शहाकार यांनी बाजी मारली. तेथे राष्ट्रवादी आणि अपक्षाला प्रत्येकी एक - एक जागा पदरात पाडून घेता आली.ग्रामपंचायतला दर्जावाढ मिळाल्यानंतर दोन्ही ठिकाणी ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती. त्यामुळे सर्वच पक्षांनी दंड थोपटले होते. भाजप आणि शिवसेनेने दोन्ही ठिकाणी स्वत:चे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले होते. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. असे असताना पारशिवनीत काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला. भाजपने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळविला असला तरी तेथे नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणता आला नाही. शिवसेनेच्या प्रमिला कुंभलकर यांनी काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांच्या मार्गातून मार्ग काढत विजय सोपा केला. पारशिवनीत शिवसेनेला चार तर काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावे लागले.वानाडोंगरी नगर परिषदेत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होता. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच पिछेहाट झाली. २१ पैकी १९ जागांसह नगराध्यक्षपदावर भाजपच्या उमेदवाराची वर्णी लागली. राष्ट्रवादीकाँग्रेसच्या केवळ एकाच उमेदवाराला विजय मिळविता आला. एका अपक्षानेही वानाडोंगरी नगर परिषदेत खाते उघडले. वानाडोंगरी नगर परिषदेची निवडणूक ही सुरुवातीपासूनच रंगतदार ठरली. १५ जुलैऐवजी १९ जुलैला मतदान झाले. त्यानंतर इव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) बदलविण्यात आल्याचा आरोप करीत ५ बूथवरील मतदान प्रक्रिया थांबविण्यात येऊन चार दिवसांनी तेथे मतदान घेण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीपासून आलेल्या अडचणीमुळे लांबत गेलेली निवडणूक प्रक्रिया अखेर पार पडली आणि निकालही जाहीर झाला. त्यामुळे तेथील उमेदवारांसह मतदारांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला.एकूण जागा ३८भाजप ३०शिवसेना ०४काँग्रेस ०२राष्ट्रवादी ०१अपक्ष ०१पारशिवनी नगर पंचायतनगराध्यक्ष : प्रमिला कुंभलकर (शिवसेना)एकूण जागा १७भाजप ११शिवसेना ०४काँग्रेस ०२वानाडोंगरी नगर परिषदनगराध्यक्ष : वर्षा शहाकार (भाजप)एकूण जागा २१भाजप १९राष्ट्रवादीकाँग्रेस ०१अपक्ष ०१

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक