शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

भाजपच्या प्रचाराचा मंत्र, मंदिरांचे वापरणार तंत्र; राम नवमीसाठी विशेष नियोजन

By योगेश पांडे | Published: March 29, 2024 11:50 PM

शेकडो मंदिरांच्या माध्यमातून प्रचार मोहिमेवर भर

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, भाजपकडून सोशल माध्यमे, थेट गृहसंपर्क यांच्यासोबतच वेगळे प्रचारतंत्रदेखील वापरण्यात येत आहे. प्रत्येक बूथवर शंभर ते दीडशे मते वाढविण्याचे टार्गेट पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. हा आकडा गाठण्यासाठी शहरातील शेकडो मंदिरांच्या माध्यमातून भाजपकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रचारावर भर देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नियोजनाला सुरुवातदेखील झाली आहे.

अयोध्येतील राममंदिरात रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. याशिवाय अनेक मंदिरांना भाजपकडून थेट किंवा कुणाच्या माध्यमातून विविध प्रकारची मदत करण्यात येत होती. यात महाप्रसाद, साहित्य वाटप, जीर्णोद्धार, परिसर नूतनीकरण किंवा इतर बाबींचा समावेश होता. मागील पाच वर्षांच्या कालावधीत याच मंदिरांच्या माध्यमातून शेकडो भजन मंडळांनादेखील विविध पद्धतीचे सहकार्य करण्यात आले. अगदी वस्तीवस्तीमध्येदेखील भजन कीर्तनांच्या कार्यक्रमांचे नियमितपणे आयोजन सुरू झाले. याशिवाय काही धार्मिक कार्यक्रमांसाठीदेखील विशेष नियोजन करण्यात आले होते.

या सर्व मंदिरांची भाजपकडून यादीच तयार करण्यात आली आहे. आता निवडणुका जाहीर झाल्यावर भाजपने या सर्व मंदिरांशी संपर्क केला असून, तेथील तंत्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रचारावर भर देण्यात येत आहे. लवकरच सर्व मंदिरांसमोर अयोध्येशी निगडित पोस्टर्स लावण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.

‘बूथ चलो’सोबत ‘मंदिर चलो’देखीलभाजपने प्रत्येक प्रभागातील मंदिरांची यादीच बनविली आहे. एकीकडे शहरातील सहाही विधानसभा मंडळांच्या सर्व प्रभागांमध्ये बूथ चलो मोहीम राबविण्यात येत आहे. तर दुसरीकडे प्रमुख पदाधिकाऱ्यांना मंदिरांमध्येदेखील जाऊन संपर्क करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

रामनवमीसाठी विशेष नियोजन१९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होणार असून, १७ एप्रिल रोजी रामनवमी आहे. भाजपकडून राममंदिराचे क्रेडिट घेण्यात येत असताना आता लोकसभेतील मतांसाठी रामनवमीच्या दिवशी वातावरणनिर्मिती करण्यावर भर राहणार आहे. रामनवमीचा दिवस प्रचाराचा अखेरचा दिवस राहणार आहे. त्यामुळे त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना मंडळ अध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Ram Navamiराम नवमीElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाnagpurनागपूर