कमलेश वानखेडेराजकोट : गुजरातमध्ये भाजपचे प्रत्येक काम मोठेे आहे. राजकोट येथे तब्बल ४५ हजार चौरस फुटाचे नवेे बांधण्यात आलेले ‘कमलम’ हेे कार्यालय पाहिल्यावर याचा अंदाज येतो. याच प्रशस्त व हायटेेक ऑफिसमधून भाजपचे इलेक्शन मॅनेजमेंट सुरू आहे.
भाजपच्या शीतल पार्क येथील या तीन मजली कार्यालयाचे धनत्रयोदशीला लोकार्पण झाले. एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या ऑफिसलाही मागे टाकेल, एवढे चकाचक आहे. प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उभेे फोटो, आत प्रवेश करताच मोठ्या हॉलमध्येे भारतमातेचा मोठा फोटो लक्ष वेधून घेतो. या कार्यालयाची महती सांगताना पदाधिकाऱ्याची छाती ५६ इंचाची होते.
असे आहे कार्यालय-
ग्राऊंड फ्लोअर : भोजनाचा प्रशस्त हॉल व किचन
- पहिल्या माळा : जिल्हाध्यक्ष, कार्यालय मंत्री, तीन सचिव, मीडिया रूम, प्रेस कॉन्फरन्स रूम
- दुसऱ्या माळा : प्रदेश अध्यक्षांसाठी कार्यालय, प्रदेश मोर्चाच्या सहा आघाड्यांचे स्वतंत्र कार्यालय, १०० आसन क्षमतेचा कॉन्फरन्स हॉल, दोन व्हीआयपी गेस्ट रूम,
लायब्ररी- तिसरा माळा : ५८० आसनक्षमतेचा व्हिडीओ हॉल, कॉम्प्युटर सिस्टम मॉनिटरिंग रूम, टेरिस गार्डन.
खर्चा... बहुत लगा !
- भाजपचे प्रशस्त कार्यालय पाहून त्याची महती ऐकून घेतल्यानंतर पदाधिकाऱ्याला सहज प्रश्न केला, खर्च किती ? त्यावर पदाधिकारी हसले. म्हणाले, ये गुजरात है, खर्चा बहुत लगा ऐसा लिख दो !