जिल्हा परिषद निवडणूक : युवा मोर्चाचा मेळावा व बैठकागणेश हुड नागपूरजिल्हा परिषदेच्या निवडणुका विचारात घेता पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसोबतच रविवारी भाजपच्या जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षांची निवड करण्याच्या निमित्ताने भव्य मेळाव्याचे आयोजन करून भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. दुसरीकडे दीड वर्षापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेली काँग्रेस मात्र सुस्त असल्याचे चित्र आहे.पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच निवडणूक असल्याने भाजपने संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. युवा मोर्चाच्या मेळाव्यात याचे संकेत दिले. गेल्या निवडणुकीत कमी मतांनी पराभव झालेल्या मतदारसंघावर भाजप नेत्यांनी लक्ष कें द्रित केले आहे. गेल्या चार वर्षात विशेष कामगिरी नसलेल्या सदस्यांना घरी बसवून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार आहे. दुसरीकडे जिल्हा काँग्रेसमध्ये शांतता आहे. सहा महिन्यात काय होईल ?भाजपची मोर्चेबांधणी काँग्रेस मात्र सुस्तच!नागपूर : माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनकि यांचा दौरा असला की काही ठराविक नेते त्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. बैठकांशिवाय दुसरा कोणताही कार्यक्रम नसल्याने कार्यकर्त्यांत नाराजी आहे. डिसेंबर महिन्यात आचारसंहिता लागणार असल्याने निवडणुकीसाठी सहा महिन्यांचाच कालावधी शिल्लक आहे. ५९ सदस्य असलेल्या जि.प.मध्ये गेल्या निवडणुकीत भाजपचे २२ सदस्य निवडून आले होते. परंतु वाडी ग्रामपंचायतीला नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्याने येथील भाजपचे सदस्य प्रेमनाथ झाडे यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे सध्या भाजपचे संख्याबळ २१ आहे. काँग्रेसचे १९ सदस्य असून शिवसेना ८ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ सदस्य आहेत. रिपाइं, गोगपा व बसपाचा प्रत्येकी एक सदस्य आहे. जि.प.मध्ये भाजप-शिवसेना युतीची सत्ता असून रिपाइं, गोगपा व बसपा सत्तेत सहभागी आहेत. शिवसेनेकडे उपाध्यक्ष पदासोबचत बांधकाम, आरोग्य, कृषी व पशुसंवर्धन असे महत्त्वाचे विभाग आहेत. परंतु जिल्हा परिषदेत भाजप-शिवसेना युती असली तरी अंतर्गत कलह विकोपाला गेला आहे. शिवसेनेचे सदस्य व सभापतींच्या फायली रोखल्या जात आहे.यामुळे नाराज असलेले उपाध्यक्ष शरद डोणेकर व कृषी सभापती आशा गायकवाड सर्वसाधारण सभेत व्यासपीठावर न बसता सदस्यांत बसले होते. यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अद्याप हा वाद शमलेला नाही.(प्रतिनिधी)नरसाळा महापालिकेत समाविष्ट हुडकेश्वर - नरसाळा गावाचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे जि.प.च्या नरसाळा मतदारसंघाची फेररचना केली जाणार आहे. त्यामुळे फेरबदल होण्याची शक्यता लक्षात घेता भाजपने मोर्चेबांधणीला सुरु केली आहे. सभापतींना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्नसमाजकल्याण सभापती दीपक गेडाम गेल्या निवडणुकीत रिपाइंच्या तिकिटावर तर महिला व बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे बसपाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. या दोघांनाही भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जि.प.तील सत्तेत सहभागी असल्याने त्यांची भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपची मोर्चेबांधणी काँग्रेस मात्र सुस्तच!
By admin | Published: May 24, 2016 2:31 AM