शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
2
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
3
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
4
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
6
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
7
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
8
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
9
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
10
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
11
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
12
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
14
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
15
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
16
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
17
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
18
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
19
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

भाजपची राज्यात सावरकर गौरव यात्रा, नवीन पिढीपर्यंत इतिहास नेणार

By योगेश पांडे | Published: March 28, 2023 1:01 PM

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिंदे गटाचे आमदारदेखील सहभागी होणार असल्याची माहिती

नागपूर : काँग्रेस नेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत असताना भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आम्ही या मुद्द्यावर जशास तसे उत्तर देऊ. भाजप राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढणार आहे, ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांमध्ये यात्रा निघणार असून पूर्व विदर्भात आ. विजय रहांगडाले व प्रवीण दटके यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिंदे गटाचे आमदारदेखील सहभागी होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे यांनी नागपुरात दिली.

राहुल गांधी एक तासदेखील काळ्या पाण्याची शिक्षा भोगू शकत नाहीत. राहुल गांधी यांची सावरकर यांच्यासमोर काहीच पात्रता नाही. नाना पटोले, राहुल गांधी यांच्या डोक्यात फरक पडला आहे. कुणावर टीका करत आहे याचे भान त्यांना राहिलेले नाही. सावरकर यांचा इतिहास पुसण्याचे काम काँग्रेस नेते करत असून आम्ही नेमका इतिहास नवीन पिढीपर्यंत घेऊन जाऊ. एक कोटी लोक यात सहभागी होणार, असेदेखील त्यांनी सांगितले. 

उद्धव ठाकरे नौटंकीबाज

आपली व मुलाची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सावरकर यांचा अपमान सहन केला. राहुल गांधी सावरकर यांच्याबाबत बोलत असताना उद्धव ठाकरे ठोस भूमिका घेऊन काँग्रेसचा हात का सोडत नाहीत ? बाळासाहेबांनी हे सहन केले नसते. उद्धव ठाकरे मिंधे का झाले? त्यांना परत मुख्यमंत्रीपद हवे आहे. आम्ही हिंदुत्व सोडले असे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे. ते नौटंकीबाज आहे. संजय राऊत हे तर सकाळचा भोंगा आहे. अडीच वर्षात राहुल गांधी यांना जाब का विचारला नाही, असा सवाल बावनकुळे यांनी केला. जर शिवसेना ढोंगी नसेल तर ठाकरे किंवा राऊत यांनी राहुल गांधी यांच्या फोटोला चप्पल मारून दाखवावी, असेदेखील बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरे