लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कन्हान) : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक जागा मिळविणाऱ्या शिवसेनेने कन्हान-पिपरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला धक्का दिला. शिवसेनेच्या करुणा आष्टणकर यांनी ५ हजार ५०५ मिळवित भाजपच्या स्वाती मनोहर पाठक यांचा २,३६९ मतांनी पराभव केला. पाठक यांना ३ हजार १३६ मते मिळाली.कन्हान-पिपरी नगर परिषदेमध्ये सत्तेच्या चाव्या मिळविणाऱ्या काँग्रेसच्या रिता नरेश बर्वे यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांना २,८६१ मते मिळाली. प्रहार जनशक्ती पार्टीच्या उमेदवार माजी नगराध्यक्ष आशा पनीकर यांना २६७६ मते मिळाली.यासोबतच आठ प्रभागातील नगरसेवकांच्या १७ जागापैकी ७ जागा मिळवित काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. काँग्रेस पाठोपाठ भाजपने ६ जागावर विजय मिळविला. शिवसेनेला तीन तर प्रहार जनशक्ती पार्टीला एका जागेवर विजय मिळाला.२०१५ मध्ये न.प.च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने ११ जागा मिळवित नगराध्यक्षपद मिळविले होते. एका अपक्षाचा भाजपला पाठिंबा होता. शिवसेनेचा तीन तर काँग्रेसचा दोन जागावर विजय झाला होता.नगर परिषदेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. यात ६२.५९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. शुक्रवारी नगर परिषद परिसरात सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालात सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे.निवडणुकीचे निकाल जाहीर होताच रामटेकचे आ. आशिष जयस्वाल, शिवसेना जिल्हा उपप्रमुख वर्धराज पिल्ले यांच्यासह शिवसैनिकांनी नगर परिषदेसमोर आनंदोत्सव साजरा केला.असा आहे निकालएकूण जागा - १७कॉँग्रेस - ७भाजप - ६शिवसेना - ३प्रहार जनशक्ती पार्टी- १