नागपूर : नागपूर महापालिका निवडणुकीची आचार संहिता २ जानेवारीला जाहीर होणार असून १५ फेब्रुवारीला मतदान होण्याचे संकेत शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनपातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपचे माजी पदाधिकारी व नगरसेवक मतदार नोंदणीच्या कामाला लागले आहेत. मात्र, त्यांना नागरिकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे काँग्रेस सुस्त असल्याचे चित्र आहे.
प्रभागनिहाय मतदार नोंदणी मोहीम राबविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नवीन मतदारांकडून नोंदणीसाठी आधार कार्ड, इलेक्ट्रिक बिल, पासपोर्ट फोटो आणि किरायादाराकरिता घर मालकाचे इलेक्ट्रिक बिल फोटो कॉफी, अशा कागदपत्रांची जुळवाजुळव करून नोंदणीसाठी अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे.
सध्या निवडणूक विभागाचे काम पूर्णतः थांबले आहे. राज्य सरकारने प्रभाग रचना व सदस्यसंख्येत बदल केल्याने पुन्हा नव्याने रचना तयार करावी लागेल. गॅझेट नोटिफिकेशन निघाल्यावरच त्याबाबतचा निर्णय होईल. जाणकार सूत्रानुसार ही निवडणूक फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे.
त्रिसदस्यीय प्रभाग रचनेची संपूर्ण प्रक्रिया मनपाच्या निवडणूक विभागाने पार पाडली होती. केवळ निवडणूक तारखांच्या घोषणेची प्रतीक्षा होती; परंतु राज्य मंत्रिमंडळाने ऐनवेळेवर २०१७ च्या सदस्यसंख्येनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर झालेल्या संपूर्ण प्रक्रिया रद्दबातल ठरल्या.
निवडणूक विभागाने प्रारंभी त्रिसदस्यीय प्रभाग रचना केली. त्यानंतर अनु. जाती, जमाती व महिलांचे आरक्षण काढले. त्यानंतर आक्षेप मागविले, त्याची नोंद घेते ना तोच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात सुटला. त्यामुळे पुन्हा आरक्षणाचे नव्याने तिढा सोडवावा. लागला. यात अनु. जाती, जमाती वगळता ओबीसी महिला, पुरुष व खुला प्रवर्ग पुरुष व महिला, असे आरक्षण काढावे लागले.
त्यामुळे संपूर्ण संपूर्ण प्रभागातील आरक्षण रचनेत बदल झाला. आता पुन्हा चार सदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय झाल्याने यापूर्वी झालेली प्रक्रिया राबवावी लागेल.
गॅझेट नोटिफिकेशनकडे सर्वांच्या नजरा
गॅझेट नोटिफिकेशनकडे सर्वांच्या नजरा आहेत. यात पुढील प्रक्रियेबाबतची स्पष्टता असेल. प्रभाग रचना चार सदस्यीय असली तरी ती २०१७ प्रमाणेच असेल तर मग चक्रानुक्रमे असेल की त्यात बदल होईल. २०१७ नुसारच प्रभाग संख्या असली तरी प्रभागांचे क्रमांक बदलतील. दिशा बदलल्याने आरक्षणातही बदल होईल. त्यामुळे गॅझेट नोटिफिकेशन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.