शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

निष्क्रिय लोकप्रतिनिधींवर भाजपचा वॉच, बुथनिहाय मतांच्या आधारे होणार मूल्यांकन

By योगेश पांडे | Published: April 09, 2024 12:03 AM

भाजपचे काही माजी नगरसेवक प्रचारात आऊट ऑफ फोकस : टार्गेट न गाठल्यास मनपातील संधी जाणार

योगेश पांडेनागपूर : मागील अनेक वर्षांपासून नागपुरात लोकसभा, विधानसभा व मनपा निवडणुकीत भाजपचेच वर्चस्व असताना, काही बुथवर भाजपची अक्षरश: धावपळ होत आहे. काही माजी नगरसेवक प्रचाराच्या रणधुमाळीतून दूरच असून, त्यांच्या निष्क्रियतेवरून कार्यकर्त्यांमध्येदेखील नाराजी आहे. अशा लोकप्रतिनिधींवर पक्षाने बारीक नजर ठेवली असून, बुथनिहाय मतांच्या आधारे त्यांचे मूल्यांकन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महानगरपालिकेच्या निवडणुका २०२२ च्या सुरुवातीलाच होणे अपेक्षित होते, मात्र या निवडणुका लांबल्या व तत्कालीन नगरसेवक माजी झाले. काही लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीच्या वेळीच नागरिकांमध्ये जात होते, मात्र दोन वर्षांपासून काहीच हालचाल न झाल्याने हे लोकप्रतिनिधी आऊट ऑफ रिच झाले. पक्षातर्फे नियमितपणे काही ना काही उपक्रम राबविण्यात येत होते, मात्र हे लोकप्रतिनिधी केवळ चेहरा दाखविण्यापुरते कार्यक्रमात पोहोचायचे व गृहसंपर्क, तसेच इतर उपक्रमांना पाठ दाखवायचे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. ही नाराजी आता पक्षाच्या नेतृत्वापर्यंत पोहोचली असून, असा लोकप्रतिनिधींवर लक्ष ठेवण्याचे सूत्रच तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या निष्क्रियतेचा अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

-नेत्यांसमोर हजेरी, प्रत्यक्षात गायब

काही निष्क्रिय पदाधिकारी हे मोठ्या नेत्यांसमोर हजेरी लावतात व तसे फोटोदेखील सोशल माध्यमांवर शेअर करतात, मात्र प्रत्यक्ष तळागाळात जाऊन काम करण्याच्या वेळी हे पदाधिकारी गायब असतात. मागील दोन ते अडीच वर्षांपासून काही जणांबाबत असा सातत्याने अनुभव येत आहे. त्यांच्या तक्रारी अगदी प्रदेशाध्यक्षांपर्यंतदेखील गेल्या आहेत. यामुळेच पक्षाने निकालानंतर बुथनिहाय मतदानाचे विश्लेषण करण्याचे ठरविले आहे. प्रत्येक बुथवर ५१ टक्क्यांचे टार्गेट देण्यात आले आहे. त्या आधारावर हे मूल्यांकन होईल, अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने दिली.

काम न करणाऱ्यांना संधी नाही

आम्ही प्रत्येक बुथवरून १००-१५० मते वाढविण्याचे टार्गेट पदाधिकाऱ्यांना टार्गेट दिले आहे. प्रत्येकाला जबाबदारी देण्यात आली आहे, काम न करणाऱ्यांना पुढे संधी मिळणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही निष्क्रिय पदाधिकाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवून आहोत. सोशल माध्यमांवर फोटो टाकणे आणि प्रचाराला पाठ दाखविणे असे प्रकार चालणार नाहीत.

- बंटी कुकडे, महानगराध्यक्ष, भाजप, नागपूर