लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोटाबंदीचा निषेध म्हणून काँग्रेसच्या दुसºया गटातर्फे संविधान चौकात काळा दिवस पाळण्यात आला. माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद, माजी आमदार अशोक धवड, आमदार सुनील केदार, महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे आदींनी एकत्र येत केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदविला. नोटबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडल्याचा आरोप या वेळी नेत्यांनी केला.केंद्र सरकारने कोणतेही नियोजन न करता वर्षभरापूर्वी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय पूर्णत: फसला आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला हकनाक त्रास सोसावा लागला. लाखो लोकांचे रोजगार गेले, हजारो लघुउद्योग बंद पडले, मोठ्या उद्योगांनाही फटका बसला. असे असतानाही सरकार आपल्या या निर्णयाचे आजही समर्थन करत आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत असल्याचे नेत्यांनी सांगितले.नोटाबंदीत १६ हजार कोटी सरकारच्या तिजोरीत जमा झाले. यावर ३५ हजार क ोटींचा खर्च झाला. ही देशातील नागरिकांची फसवणूक असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी नोटाबंदीनंतर एटीएमच्या रांगेत उभे असताना मृत्युमुखी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी आमदार यादवराव देवगडे, के.के.पांडे, नितीन कुंभलकर,संजय दुबे, कुणाल राऊत, जुल्फिकार भुट्टो,हर्षला साबळे,कमलेश चौधरी, दिनेश यादव, आयशा अन्सारी, परसराम मानवटकर, प्रणिती शहाणे, स्नेहा निकोसे, मनोज गावंडे, झिशान मुमताज, सैयदा बेगम निजाम, गार्गी चोप्रा, अमीर नुरी, कामठीचे नगराध्यक्ष साजा सेठ, संजय मेश्राम, यशवंत कुंभलकर, विजय बाभरे, बाबा वकील, अरुण डवरे, सुभाष खोडे, दीपक कापसे, पुरुषोत्तम लोणारे, अजितसिंह, धीरज पांडे, चंद्रकांत हिंगे, ठाकूर जग्यासी, इंद्रसेन ठाकूर, अनिल राय, मोतीलाल गुप्ता, आवळे गुरुजी, विजय हजारे, सिंधू उईके, वसंत गाडगे, रवी सातपुते आदी उपस्थित होते.
नोटाबंदीचा ‘काळा दिवस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:45 AM
नोटाबंदीचा निषेध म्हणून काँग्रेसच्या दुसºया गटातर्फे संविधान चौकात काळा दिवस पाळण्यात आला. माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद, माजी आमदार अशोक धवड...
ठळक मुद्देसंविधान चौकात काँग्रेसच्या दुसºया गटाचे आंदोलन