कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तापमान वाढताच पुन्हा राज्यात वीज संकटाची चिन्हे दिसू लागली आहेत. कोळशाच्या पुरेशा पुरवठ्यानंतरही चार वीज केंद्रांना कोळशाच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. सूत्रानुसार ऊन वाढताच या चारही वीज केंद्रातील उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता आहे. हे संकट सोडविण्यासाठी मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत बैठका सुरू आहेत.
गेल्यावर्षीही याच काळात केंद्रांना कोळसा टंचाईचा सामना करावा लागला. आता कोळशाचा साठा १६ लाख मेट्रिक टन आहे. मात्र वाहतूक समस्येमुळे कोळसा फक्त कोराडी, खापरखेडा व चंद्रपूर या केंद्रांवरच उपलब्ध होत आहे. नाशिक, भुसावळ, पारस व परळी येथे कोळशाचा साठा संवेदनशील स्थितीत पोहोचला आहे.
तब्बल २० तासांचा उशीरnमहानिर्मितीच्या मते, मध्य रेल्वेतर्फे बडनेराजवळ थर्ड लाइन तयार केली जात आहे. अन्य विकास कामेही सुरू आहेत. यामुळे कोळशाची वाहतूक करणाऱ्या रेल्वे गाड्यांची गती कमी झाली आहे. nया गाड्या १३ ते २० तास उशिरा पोहोचत आहेत. रेल्वेच्या सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे. ब्लॉक घेऊन दुरुस्तीची कामे सुरू असल्याने रेल्वे गाड्यांची गती कमी झाली आहे.
किती दिवस पुरेल कोळसा साठा? वीज केंद्र दिवसखापरखेडा २२ चंद्रपूर १४ कोराडी १२नाशिक ०४ भुसावळ ०१ पारस २परळी ३.५
बैठकांचे सत्र, दिल्लीत मंथन कोळसा वाहतूक संकटाबाबत शनिवारी सुटी असतानाही दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्ये कोळसा, रेल्वे व ऊर्जा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महानिर्मिती व कोल इंडियाचे प्रतिनिधी सहभागी झाले. महानिर्मितीचे संचालक (खनिकर्म) राजेश पाटील म्हणाले, शुक्रवारीही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा झाली होती. सर्व विभागांशी समन्वय साधून संकट दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
विदर्भाच्या भरवशावर राज्यात उजेडराज्यात २८ ते २९ हजार मेगावॅट असलेली विजेची मागणी वळवाच्या पावसामुळे कमी होऊन २३ हजार मेगावॅटवर आली. मात्र, तापमान वाढताच मागणी वाढून अडचणी येऊ शकतात. सद्यस्थितीत भुसावळ, नाशिकचे एक-एक युनिट बंद आहे. विदर्भातील कोराडी, खापरखेडा व चंद्रपूर वीज केंद्रातूूून सुमारे ६५ टक्के वीज महाराष्ट्राला मिळत आहे. अदानीच्या तिरोडा केंद्रातून ३०८५ मेगावॅट व एनटीपीसीमधून ४३७५ मेगावॅट वीज मिळते.