जितेंद्र ढवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तुम्ही तुमच्या पाळीव पशुंना पत्ताकोबी, पालक, सडलेले टोमॅटो आहार म्हणून देता का ? तसे करीत असाल तर तुम्ही तुमच्या पशुंचे आयुष्य कमी करीतआहात. कारण या सर्व भाज्यात ‘आॅक्झालेट’चे प्रमाण अधिक असल्यामुळे पाळीव प्राण्यात सध्या मूत्राशयाशी संबंधित आजार अधिक वाढत असल्याचे तथ्य अभ्यासातून पुढे आले आहे. मूत्राशयाच्या या आजारावर वेळीच उपचार न मिळाल्यास तुमचा पाळीव पशु दगवण्याची जास्त भीती आहे. ग्रामीण आणि शहरी पशुआहाराचे प्रमाण कमी झाल्याने भाजी मंडीतील पालक, स्वस्तातील कोबी आणि सडलेले टोमॅटो पशुंना आहारात देण्याचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढले आहे. या भाज्यामुळे पशुंचे वजन वाढत असल्याचा पशुपालकांचा समज असला तरी हा समज त्यांच्यासाठी धोक्याचा ठरतो आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातील अभ्यासकांनी केलेल्या अध्ययनातून ही बाब पुढे आली आहे.या भाजीपाल्यातील ‘आॅक्झालेट’चा शरीरातील कॅलशियम सोबत संभोग झाल्याने पशुंना किडनी स्टोन (मूत्राशयाचा) आणि थायरॉईडचा आजार होतो. ग्रामीण भागात अशा पशुंचे प्रमाण कमी असले तरी नागपुरातील मोमीनपुरा परिसरातील पशुपालकांच्या बकऱ्या आणि बोकाडांना मूत्राशयाचा हा आजार अधिक असल्याची माहिती पुढे आली आहे. या आजारामुळे पशुंची लघुशंका बंद पडते. अशा पशुवर ७२ ते ९६ तासात उपचार न झाल्याने मूत्राशयातील त्यांचे ब्लडर फुटण्याची जास्त भीती असते. परिणामी यामुळे पशुचा मूत्यू होतो.
दोन प्रकारच्या शस्त्रक्रियापशुंना मूत्रशयाच्या होणाऱ्या या आजारावर दोन प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. या पहिली मूत्राशय (सिसटॉटामी) तर दुसरी शस्त्रक्रिया मूत्रनलिकेची(युरेथ्रोटॉमी) केली जाते,असे पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शैक्षणिक पशुचिकित्सालय संकुलाचे संचालक डॉ.एस.बी.आकरे आणि अधीक्षक डॉ.बी.एम.गहलोत यांनी सांगितले.
पाळीव कुत्र्यांना रेडिमेटड फूडचा फटकाबाजारात उपलब्ध असलेल्या रेडिमेड फूडमुळे पाळीव कुत्र्यांना मूत्राशयाचे आजार होत असल्याची माहिती पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी दिली. रेडिमेड फूडमध्ये ‘आॅक्झालेट’चे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.