पोलिसांची राहणार नजर : उपराजधानीत कडेकोट बंदोबस्त नागपूर : होळीत रंग लावण्याच्या बहाण्याने महिलांची छेड काढणे आणि रस्त्याने ये-जा करणाऱ्यांवर रंग व पाण्याने भरलेले फुगे मारणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. कारण या होळीत अशा लोकांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. होळी हा आनंदाचा व उत्साहाचा सण आहे. परंतु काही जण उत्साहाच्या भरात गालबोट लावतात. होळीत नेहमीच दारू पिऊन रस्त्यांवर हैदोस घालणारे रंग लावण्याच्या बहाण्याने महिलांची छेड काढतात किंवा आपली हौस म्हणून रस्त्याने ये-जा करणाऱ्यांवर पाणी व रंगाने भरलेले फुगे फेकून मारतात. यामुळे अनेकांना विनाकारण त्रास होतो काही जणांचे अपघातही होतात. ही बाब लक्षात घेता होळीच्या एक दिवसापूर्वीपासूनच शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
रंगाने भरलेले फुगे माराल तर तुरुंगात जाल !
By admin | Published: March 12, 2017 2:33 AM