वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या विपरीत प्रभावामुळे नागपुरातील रक्ताची मागणी २० टक्के घटली आहे. दुसरीकडे रक्ताचे संकलनही ८० टक्के कमी झाले आहे. याच कारणाने रक्तपेढीतर्फे गरजवंतांना रक्तपुरवठा करताना आधी कुठल्याही रक्तगटाच्या रक्ताची मागणी करीत आहेत. कोविड काळातील निबंर्धामुळे रक्तदान शिबिरांचे आयोजनही कमी झाले आहेत. त्यामुळे आधीसारखे संकलन होत नसल्याने रक्तपेढ्यांजवळही रक्ताचा तुटवडा भासत आहे.संक्रमणाच्या भीतीमुळे सुदृढ लोकही रक्तदान केंद्रामध्ये रक्तदानासाठी जाण्यास धजावत नाही. दुसरीकडे कोण कोविड रुग्ण आहे. या संभ्रमात रक्त संकलनाचे कामही प्रभावित झाले आहे. मात्र यामुळे गरजवंत रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. याबाबत लाईफलाईन ब्लड बँकेचे डॉ. हरीश वरभे यांनी सांगितले, आधी दर महिन्याला शहरात ५० च्यावर रक्तदान शिबिर व्हायचे आणि जवळपास ३००० वर रक्तदाते रक्तदान करायचे. मात्र लॉकडाऊनच्या काळात केवळ ५ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये केवळ २० नागरिकांनी रक्तदान केले. थॅलिसिमिया रुग्णांना नेहमी रक्ताची आवश्यकता असते. आमच्या संस्थेने १२९ रुग्ण मुलांना रक्तदानासाठी दत्तक घेतले आहे.कोविड रुग्ण २८ दिवसानंतर करू शकतात रक्तदानकोविड पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाल्याच्या २८ दिवसानंतर रक्तदान आणि १४ दिवसानंतर प्लाज्मादान करू शकतात. ते १५ दिवसानंतर पुन्हा प्लाज्मा देण्यास सक्षम असतात. एका व्यक्तीकडून मिळालेल्या प्लाज्माने दोन रुग्णांचे प्राण वाचविले जाऊ शकतात. देशात सर्वाधिक सुरक्षित प्लाज्मा तपासणीची (आरबीडी ६४० प्रमाण) व्यवस्था नागपुरातच आहे.- डॉ. हरीश वरभेबॅलेन्स घटलेब्लड बँकेमध्ये आधीच्या तुलनेत रक्ताचे बॅलेन्स कमी झाले आहे. मार्च व एप्रिल महिन्यात महाविद्यालये बंद राहत असल्याने नेहमी रक्त संकलनात घट होते. यावेळी कोविड आणि लॉकडाऊनचाही प्रभाव पडला. महाविद्यालये आतापर्यंत सुरू झालेले नाहीत. या कारणाने रक्तपेढ्यात रक्ताचा तुटवडा आहे. मात्र मागणी केल्यानंतर रक्तपुरवठा करण्यास आतापर्यंत समस्या आलेली नाही.- डॉ. संगीता मेहता, बीटीओ, राज्य रक्त संक्रमण परिषद