नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत आणि ‘डॉ. हेडगेवार रक्तपेढी होल ब्लड कॉम्पोनंट सेंटर’ यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर शनिवार २ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत, रामदासपेठ येथील लोकमत भवन, ‘बी-विंग’च्या अकरावा मजला येथे होणार आहे. निरंतर निष्काम कर्म आणि सेवाकार्याची प्रेरणा देणारे आदर्श व्यक्तिमत्त्व ‘बाबूजी’ यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत ‘लोकमत’च्यावतीने वर्षभर सेवा भावनेतून अनेक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून जनहितासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एक सामाजिक जाणीव म्हणून या पवित्र कार्यात जास्तीत जास्त संख्येत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ‘लोकमत’चे वाचक, लोकमत सखी मंच, युवा नेक्स्टच्या सदस्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी करावे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या रक्तदात्यांना भेटवस्तू व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी व रक्तदान करणाऱ्यांनी लोकमत भवन रामदासपेठ येथे किंवा फोन नं. २४२९३५५, ९८५०३०४०३७, ९९२२९६८५२६ वर संपर्क साधावा. (प्रतिनिधी)
बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिर
By admin | Published: July 02, 2016 3:02 AM