नागपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या पर्वावर राज्यभरात ‘लोकमत रक्ताचं नातं’ हे रक्तसंकलन अभियान राबविण्यात येत आहे. त्याच शृंखलेत गुरुवारी १५ जुलै रोजी जिल्ह्यात नऊ ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
नागपूर युवक काँग्रेस
नागपूर युवक काँग्रेसच्या वतीने गुरुदेव सेवा मंडळ, रमण सायन्स सेंटर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन नगरसेवक बंटी शेळके यांच्या हस्ते होईल.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नागपूर शहर(जिल्हा)च्या वतीने सकाळी ११ वाजता गणेशपेठ, एसटी स्टॅण्डजवळील राहुल कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, रिजवान अन्सारी, शैलेंद्र तिवारी व लक्ष्मी सावरकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल.
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस
- महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या महासचिव डॉ. रिचा जैन यांच्या वतीने रिचाज युनिक क्लिनिक, गांधी ग्रेन मार्केट, टेलिफोन एक्सचेंज चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. उद्घाटन डॉ. रिचा जैन यांच्या हस्ते होईल.
दंदे फाऊंडेशन
दंदे फाऊंडेशनच्या वतीने सकाळी ११ वाजता नागपूर नागरी सहकारी हॉस्पिटल, अलंकार टॉकीजच्या समाेर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. पिनाक दंदे यांनी केले आहे.
कमला नेहरू महाविद्यालय
कमला नेहरू महाविद्यालयाच्या वतीने सक्करदरा येथील महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्मिता वंजारी, दिलीप बडवाईक व उपप्राचार्य प्रदीप दहीकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल.
देवा उसरे स्मृती
माजी नगरसेवक देवा प्रसाद उसरे यांच्या जयंतीनिमित्त वायएमसीए, मोहननगर येथे सकाळी १० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आ. विकास ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल.
साई आस्था फाऊंडेशन
साई आस्था फाऊंडेशन, ओंकारनगरच्या वतीने मानेवाडा, बेसा रोड येथील मीर मेडिकल स्टोअर येथे सकाळी ९ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर पोलीस सह. आयुक्त सुनील फुलारी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. यावेळी गोंदिया-गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, मध्ये रेल्वेचे एसडीसीएम कृष्णान्त पाटील, प्रसिद्ध उद्योजक सत्यनारायण नुवाल उपस्थित राहतील. नागरिकांनी रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आशिषकुमार नागपुरे यांनी केले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती नरखेड
- कृषी उत्पन्न बाजार समिती नरखेडच्या वतीने शेतकरी भवन येथे सकाळी १०.३० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माजी गृहमंत्री आ. अनिल देशमुख, माजी आ. आशिष देशमुख यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होईल. यावेळी नगराध्यक्ष अभिजित गुप्ता, पं.स. सभापती नीलिमा रेवतकर, कृउबासचे सभापती बबनराव लोहे, पांडुरंग बानाईत, माजी उपसभापती वैभव दळवी, तहसीलदार डी. जी. जाधव, खंडविकास अधिकारी प्रशांत मोहोड, मुख्याधिकारी प्रवीण मानकर, आरोग्य अधिकारी डाॅ. विद्यानंद गायकवाड, पोलीस निरीक्षक जयपालसिंग गिरासे, सतीश आदी उपस्थित राहतील.
स्व. अरुणजी भोयर लोकसेवा प्रतिष्ठान वेलतूर
- स्व. अरुणजी भोयर लोकसेवा प्रतिष्ठान, राजे शिवछत्रपती ग्रुप, न्यू सार्वजनिक बाल गणेश मंडळाच्या वतीने सकाळी ११ वाजता सांस्कृतिक भवन, पोलीस स्टेशनच्या मागे, वेलतूर, ता. कुही येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन जि.प. सदस्य कविता साखरवाडे, सरपंच सविता किंदरले, माजी जि.प. सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष मनोज तितरमारे, वेलतूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार कविराज, उपसरपंच प्रशांत तितरमारे, आकरे, पोलीस भरती अकादमीचे संचालक धारगावे उपस्थित राहतील.