लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीप्रित्यर्थ २ ते १५ जुलै दरम्यान ‘लोकमत रक्ताचं नातं’ ही राज्यव्यापी रक्तसंकलन मोहिम मोठ्या स्तरावर राबविण्यात येत आहे. या मोहिमेत राज्यभरातील विविध सामाजिक संघटना सहभागी होत असून, नागरिकही उत्स्फुर्ततेने रक्तदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत. तरुण-तरुणींचा व प्रथमच रक्तदान करणाऱ्यांचा उत्साह या अभियानात दिसून येत आहे. याच श्रुंखलेत बुधवारी ७ जुलै रोजी नागपूर जिल्ह्यात चार ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक जाणिवा समृद्ध करणाऱ्या या मोहिमेत नागरिकांनी सहभाग द्यावा, असे आवाहन लोकमतच्या वतीने करण्यात येत आहे.
---------------
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
- लोकमत व महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नागपूरच्या वतीने दीनदयालनगर येथील राधेमंगलम सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ वाजताच्या दरम्यान शिबिरात नागरिकांना सहभागी होता येईल. शिबिराचे उद्घाटन मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते होईल. यावेळी शहर अध्यक्ष अजय ढोके, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक सचिन धोटे, विशाल बडगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहतील. बीसीएन व बीटीपी ग्रुप
लोकमत, बीसीएन व बीटीपी ग्रुपच्या वतीने सोमवारी क्वॉर्टर येथील संत रविदास सभागृहात रक्तदान व रोग निदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ४ वाजतापर्यंत शिबिरात रक्तदात्यांना सहभाग घेता येईल. परिसरातील नागरिकांनी रक्तदानाच्या राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी होण्याचे आवाहन बीसीएन व बीटीपी ग्रुपचे चेअरमन सिराज शेख व डायरेक्टर इमरान शेख यांनी केले आहे.
-----------
किशोरभाऊ वानखेडे बहूद्देशीय संस्था व परिवर्तन महिला समिती
- ‘लोकमत रक्ताचं नातं’ या राज्यस्तरीय महारक्तदान मोहिमेअंतर्गत बुधवारी (दि.७) रोजी दुर्गामंदिर बुटीबोरी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. लोकमत, स्व. किशोरभाऊ वानखेडे बहूद्देशीय संस्था व परिवर्तन महिला समिती, बुटीबोरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले. सकाळी १० वाजता शिबिराचे उद्घाटन होईल. याप्रसंगी नगराध्यक्ष राजेश (बबलू) गौतम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मुजीब पठाण, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चव्हाण, बुटीबोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, माजी सभापती अहमदबाबू शेख, भाजपा मंडळ अध्यक्ष आकाश वानखेडे, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, उपाध्यक्ष व बांधकाम सभापती अविनाश गुर्जर, नियोजन सभापती अरविंद जयस्वाल, शिक्षण सभापती विनोद लोहकरे, आरोग्य सभापती अनिस बावला, पाणीपुरवठा सभापती मंदार वानखेडे, संध्या आंबटकर, जिल्हा परिषद सदस्य अतिष उमरे, नगरसेवक प्रवीण शर्मा, बबलू सरफराज, मनोज ढोके, महेंद्र चव्हाण, राजू गावंडे, बाबू पठाण, शमशाद पठाण, नंदा पाटील, ममता बारंगे, तुषार डेरकर उपस्थित राहातील. बुटीबोरी शहरातील नागरिकांनी शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदान करावे, असे आवाहन बुटीबोरी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती मंदार वानखेडे यांनी केले आहे. ल.
---------------------
आजचे रक्तदाते
ए पॉझिटिव्ह - डॉ. आदित्य सरोदे, पंकज बांते, विलास रोकडे, प्रशांत सावसाकडे, पवन मडकाम, आकाश मेश्राम, शुभम मेश्राम, मनोज वाढई, शुभम तुरक, योगेश वराडे, चेतन गायकवाड, अतुल लाडीखाये, अक्षय चौधरी, प्रमोद भैसारे, प्रतीक ठाकरे, गजू खंदे, महेश डडमल, विजय केवट, महादेव नंदनवार, कमलेश रंभाड, आशुतोष मोटे, सोनबा मेश्राम, श्रीराम डोईफोडे, शेषराव भोयर, राजेंद्र कोहाड.
--------------
बी पॉझिटीव्ह - श्रीहरी कुसराय, संतोष खंडेराव, अर्पित जगताप, गजानन नागडे, निशांत राखुंडे, कुलदीप बोरकर, अनिकेत गजभिये, अभिषेक गावंडे, पंकज तिहिके, गौतम बागडे, स्वप्निल हरणे, विकास बहादुरे, सोपान धुर्वे, राजेंद्र सेलोकर, प्रदीप गुप्ता, देवेंद्रसिंह अरोरा, विशाल वाघमारे, अमोल वारजूरकर, राहुल गुप्ता, भूषण नागोशे, देवराव जगताप, प्रशिक खोब्रागडे, अनिकेत आदमने, राजकुमार वंजारी.
------------
एबी पॉझिटीव्ह - नयन नागोशे, डुगदेव तिमांडे, पंकज कुळमेथे, चंद्रकांत रेवतकर.
-------------
ओ पॉझिटिव्ह - चंदन नगराळे, आकाश वाघमारे, अनिल मिरे, अनुप नागोशे, रवींद्र शेंडे, गिरीश वैरागडे, इशाक शाह, अमित आदमने, रोशन आदमने, राजन भोयर, नीलिमा नागोशे, देवानंद अगाव, नितेश वारजुरकर, साहिल ढोक, अयुबखान पठाण, नरेंद्र पटले, नितीन लांबट, कविता येंडे, रामराव टाेंग, आकाश गेडाम, विजय चौधरी, निरंजन पिरे, समीर राऊत, श्याम गीरी, गणेश वाटकर, सुधाकर दिघोरे, नरेश वाटबारई.
-------------
ए निगेटिव्ह - अंकित सोनटक्के.
-------------
इतर रक्तदाते - कौस्तुभ जानी, किशोर विश्वास, रिषभ पाटणे, केतन शर्मा, स्वप्निल कपूर, मिलिंद समर्थ.................