नागपूर : रक्तसंक्रमणाच्या, रक्तघटक वेगळे करण्याच्या अत्यंत आधुनिक पद्धती विकसित झाल्या, परंतु विज्ञानाला मानवी रक्ताचा पर्याय शोधता आला नाही. यामुळे रक्ताविना तडफडत असलेल्या रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी स्वेच्छेने पुढे येऊन रक्तदान करणारा रक्तदाता हा देवदूतच ठरतो. कोरोना संकटामुळे निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत-रक्ताचं नातं’ या राज्यव्यापी मोहिमेचा शुक्रवारी शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेत विविध संस्था, संघटना व वैद्यकीय महाविद्यालय हिरिरीने सहभागी होऊन राष्ट्रीय कर्तव्य बजावत आहेत.
या मोहिमेंतर्गत शुक्रवारी लोकमत भवनातील स्व. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून आदरांजली वाहिली. या पवित्र कार्यात तरुणांसोबतच, प्रौढ व महिलाही सहभागी झाल्या. लोकमतचे वाचक, अधिकारी, कर्मचारी, युवा नेक्स्टचे सदस्य व सखी मंच सदस्यांनी शिबिराला भरभरून प्रतिसाद दिला. या शिबिराला ‘लाईफलाईन ब्लड बँक कम्पोनंट व अप्रायसेस सेंटर’ व ‘डागा रुग्णालय रक्तपेढी’ यांनी सहकार्य केले. शिबिरात १८ ते ६० वर्षांपर्यंतच्या दात्यांनी रक्तदान केले. सकाळी १०.३० वाजेपासून सुरू झालेल्या या शिबिरात सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदात्यांनी गर्दी केली होती.
-डागा व लाईफलाईन रक्तपेढीचे सहकार्य
डागा रक्तपेढीचे डॉ. राजरत्न वाघमारे, डॉ. रवींद्र पांडे, दिलीप पामपट्टीवार, नंदा राऊत, वर्षा बालपांडे, आरती कांबळे यांनी सहकार्य केले. लाईफलाईन रक्तपेढीचे प्रवीण साठवणे, डॉ. अपर्णा सागरे, रवी गजभिये, भुमेश झेलगंडे, सीमा कुमरे, अंकिता सांगोळे, मेघा रामटेके, जयश्री वानखेडे, स्नेहा कांबळे, रिया ढोमणे, शंकर तुरणकर, वैभव लोहकरे, मंगेश राणे, कुणाल शिंदे, हरीश ठाकूर, विशाल घोडमारे आदींनी सहकार्य केले.
- यांनी केले रक्तदान
प्रमोद भोपे, अश्विनी मेश्राम, घनश्याम गावंडे, अर्चना जामगडे, भूषण सातपुते, लियाकत अली, अरविंद बावणकर, आश्लेष लबडे, होमेश्वरी वाडीखरे, मेहवश मिर्झा, जरहा मिर्झा, प्रथमेश अरजे, वंदना चंदनगीर, अनघा वैद्य, आशिष जैन, निखिल शेलोटे, सचिन सावरकर, आशित भुजाडे, श्रेयस ठाकरे, अमित फुलबांधे, रूनेश खोब्रागडे, राजेश चौधरी, मेहमूद खान, जितेंद्र ढवळे, प्रमोद पारधी, शैलेश गणवीर, सार्थक चौरसिया, अजयसिंह तोमर, महेश श्रीवास, कमलेश रहांगडाले, गोविंद विश्वकर्मा, संदीप भोंग, फजल शेख, ललित डोंगरदिवे, रूपेश बोकडे, हर्षल झोडे, उमेश टेंबूरकर, निशांत महात्मे, विश्वास भिवापूरकर, सईद अली, अंकुश राकडे, श्रीवास कुमार, तरुणेंद्र पाठक, राजाराव रेड्डी, पुंडलिक ढबाले, शेख रियाज, अनिरुद्ध ओझा, धनंजय फाटे, अनिल गोसावी, विशाल मेश्राम, रजत मुंडले, अक्षय हेडाऊ, अमन जेमुरडे, रमेश मारवाडी, अमित गोनाडे, राजीव सिंह, फहिम पठाण, स्वप्निल मर्जिवे, सुधाकर बागडे, चंद्रशेखर डबाले, सुभाष कोठे, स्वप्निल अरविनकर, स्वराज राठोड, दिनेश सेल्वराम, मतीन खान, मोरेश्वर तिमांडे, मुश्ताक शेख, प्रफुल्ल नंदा, शिकेश निकोडे, सुब्रतो चॅटर्जी, दर्शन डांगे, देवेंद्र मरारकोठे, सुभाष इंगोले, विजय बन्सोड, सुनील मिश्रा, मीनाक्षी मेनन, रविराज अंबडवार, स्वप्निल चाफले, कमलाकर वैरागडे, रवींद्र काकडे, गोलू जेठामल, अरुण मुकुंद, आशिष आष्टनकर, अयाज शेख, विजय नगरकर, सुरेश पान्हेकर, संदीप पाटील, रवींद्र ठाकूर, सदानंद कालकर, राकेश बारई, ओंकार दखने, अरुण मेंढे, प्रभाव बोकारे, राजेश शिंदे, अनुजा मस्के व सुमेध वाघमारे यांनी रक्तदान केले.
.............................................................................
-मेडिकलचे डॉक्टर, विद्यार्थ्यांनी केले रक्तदान (फोटो)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ यांच्यासह ‘एएसएमआय’ व ‘एससीएमसी’ या विद्यार्थी संघटनेच्या वतीने जागतिक डॉक्टर्स डे व ‘लोकमत-रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. दीप्ती जैन, डॉ. दिनकर कुंभलकर, रक्तपेढीचे प्रमुख डॉ. संजय पराते, मार्डचे अध्यक्ष डॉ. सजल बंसल, डॉ. पौर्णिमा कोडाटे, डॉ. प्रवीण मेश्राम, डॉ. आंचल लोहिया आदी उपस्थित होते. शिबिराच्या आयोजनासाठी विद्यार्थी संघटनेचे सर्व पदाधिकारी व किशोर धर्माळे, अमोल फाटे, जागृती सिंगनजुडे, उज्ज्वला ढेंगे, गौरी निंबाळकर, वीणा पाटील, महिमा शिंदे, नितीन बेलसरे, संतोष टेंभेकर व राहुल पाटील आदींनी सहकार्य केले.
-यांनी केले रक्तदान
आदर्श कणकम, डॉ. अभय मुस्ताफर, डॉ. चिराग रमनानी, डॉ. मोहन शेवाळकर, डॉ. मुकुल देशपांडे, अमोल लांजेवार, डॉ. रजत माहेश्वरी, डॉ. शुभम मुसंत, डॉ. शेख वसीम, डॉ. संजीवनी सिन्हा, डॉ. रोशन धंदरे, सचिन मडावी, हर्षद जैन, देवाशिष पाटील, डॉ. भूषण दुधाने, फरिद खान पटवारी, श्वेतांग ज्योतिषी, संजय लोखंडे, अनुराग अबुजवार, चैतन्य साळवे, सार्थक मस्के, परशुनाथ वरठी, विठ्ठल पाठराबे, आर. एन. यादव, गौरव पटले, सौरभ सोनवने, शुभम रागीट, डॉ. दीपांजना मुजुमदार, प्रेरणा देवतळे, शुभ्रा जोशी.
..........................................................................
-‘आयएमए’चा रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद ()
‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) नागपूर शाखेच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’च्या दिनी ‘लोकमत-रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन ‘आयएमए’ राज्याचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, नागपूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, लोकमत टाइम्सचे संपादक एन. के. नायक, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शिबिराला ‘जीएसके ब्लड बँक’ व मेडिकलच्या आदर्श रक्तपेढीने सहकार्य केले. यावेळी जीएसके ब्लड बँकेच्या डॉ. श्वेता खंडेलवाल आणि मेडिकल रक्तपेढीकडून डॉ. टिना यांच्यासह ‘आयएमए’चे सचिव डॉ. सचिन गाठे, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. प्रशांत निखाडे, डॉ. संजय देशपांडे, डॉ. अजय काटे, डॉ. अविनाश वासे, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. आशिष खंडेलवाल, डॉ. मुकेश वाघमारे, डॉ. प्रशांत राठी, डॉ. मंजूषा गिरी, डॉ. कमलाकर पवार आदी उपस्थित होते.
..........................................................................
‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’ने जोडले रक्ताचे नाते ()
‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या नागपूर शाखेने रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्ताशी नाते जोडले. ‘आयसीएआय’च्या ७३ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व ‘लोकमत-रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत आयोजित या शिबिराचे उद्घाटन वरिष्ठ सीए दिलीप रोडी यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष सीए जयदीप शाह उपस्थित होते. स्वागत भाषण शाखा अध्यक्ष सीए साकेत बगडिया यांनी केले. क्षेत्रीय परिषद सदस्य सीए अभिजीत केळकर यांनी शिबिराला शुभेच्छा दिल्या. आरोग्य शिबिराचे सीए पीसी सारदा, रक्तदान शिबिराचे सीए शंभू टेकरीवाल व पोस्ट कोविड मार्गदर्शन शिबिराचे हेमल कोठारी यांनी उद्घाटन केले. संचालन सीए जितेन सगलानी व सीए अक्षय गुल्हाने यांनी केले. आभार सीए संजय अग्रवाल यांनी मानले. याप्रसंगी किरीट कल्याणी, जुल्फेश शाह, ओ. एस. बागडिया, स्वप्निल घाटे, संदीप जोतवानी, अनिल केडिया, प्रणव लिमाजा, वरद राजन, अमेय सोमन, अविरल बरंगे, राधिका तनेजा, करण अग्रवाल, करण ताजने, रवीना तायडे व पराग जैन उपस्थित होते.
..........................................................................
-मेयोचे डॉक्टर व विद्यार्थ्यांचा रक्तदानासाठी पुढाकार ()
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’च्या वतीने जागतिक ‘डॉक्टर्स डे’ व ‘लोकमत-रक्ताचं नातं’ या मोहिमेंतर्गत आयोजित रक्तदान शिबिराला डॉक्टरांसह विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. उद्घाटन मेयोच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. भावना सोनावने यांच्या हस्ते झाले. यावेळी पीएसएम विभागाचे प्रमुख डॉ. अशोक जाधव, रक्तपेढीचे प्रमुख डॉ. बलवंत कोवे, डॉ. प्रदीप बुटले उपस्थित होते. मार्डचे अध्यक्ष डॉ. रजत अग्रवाल यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी शिबिराच्या आयोजनात सहकार्य केले.