रामटेक : आकाशझेप फाऊंडेशनच्या आम्ही भारतीय अभियानाच्यावतीने रामटेक शहरात रविवारी (दि. १५) रक्तदान व आराेग्य तपासणी शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात ५१ तरुणांनी रक्तदान केले तर ६७२ नागरिकांच्या आराेग्याची तपासणी करण्यात आली.
मनाम एकता मंच, नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट युथ, इक्विटास स्मॉल फायनान्स बँक, अपूर्व ट्रेडर्स, नगर परिषद रामटेक व इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित करण्यात आलेल्या या शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून आ. ॲड. आशिष जयस्वाल, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, खंडविकास अधिकारी प्रदीप ब्रह्मनाेटे, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. चेतन नाईकवार, विजय हटवार उपस्थित हाेते. या शिबिरात नागरिकांच्या अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, दंतरोग, नाडी परीक्षण, आयुर्वेद चिकित्सा पंचकर्म, रक्त व इतर तपासणी करण्यात आली तसेच मोफत औषधी वितरण करण्यात आले. डॉ. इरफान अहमद, डॉ. प्रदीप बोरकर, डॉ. अंशुजा किंमतकर, डॉ. मोहित दळवेकर, डॉ. विशाल कोडापे, डॉ. पायल कटरे, डॉ. भूमेश्वर नाटकर, डॉ. पंकज जेसवानी, डॉ. करण अहीरकर, डॉ. धम्मांकुर कांबळे, डॉ. रायभान डोंगरे, डॉ. गजेंद्र बरबटे, डॉ. अश्विनी बरबटे , डॉ. चेतन नाईकवार, डॉ. प्रकाश उजगरे यांचा ‘आरोग्य भूषण’ म्हणून गाैरव करण्यात आला. मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, नगरसेवक सुमित कोठारी, गोपी कोल्लेपरा, प्रमोद खंडार, श्याम सावजी, राजकुमार खोब्रागडे, प्रकाश उंबरकर, मेयो रक्तपेढीचे डॉ. सागर गवई व त्यांच्या सहकाऱ्यांचाही गाैरव करण्यात आला. गणेश धानोरकर व रवी धानुरकर यांनी मरणोपरांत अवयवदानचा संकल्प केला. कार्यक्रमाला साक्षोधन कडबे, अरविंद दुनेदार, दिलीप पवार, ताराचंद चव्हाण, वैभव तुरक, शैलेश वाढई, चेतन मेश्राम, सतीश सुरुसे, रुस्तम मोटघरे, राजू बर्वे, ऋषिकेश किंमतकर, वेदप्रकाश मोकदम, शुभा थुलकर, दीपा चव्हाण, दुर्याेधन कडबे, कार्तिक हजारे, पंकज माकोडे, राहुल गजभिये, अविनाश मैंद, अनिकेत मैंद, प्रफुल्ल राऊत, प्रशांत वाघमारे, आकाश लेंडे उपस्थित होते.