आनंद डेकाटे । लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंध-अपंगांसाठी शासकीय इमारतींमध्ये विशेष रॅम्प तयार करण्यात यावा, अशा न्यायालयाच्या सूचना आहेत. त्यानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये रॅम्पची व्यवस्था करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात यापुढेही जाऊन अंधांना संपूर्ण कार्यालयातील विविध विभागांमध्येही सहजपणे जाता यावे, यासाठी विशेष मार्ग तयार करण्यात आला आहे. याबाबत विभागीय आयुक्तांचे विशेष कौतुक केले जात आहे. परंतु कार्यालयातीलच काही कर्मचाºयांनी अंधांच्या या मार्गातच खुर्च्या टाकून व्यत्यय निर्माण केला आहे. या कर्मचाºयांची ही असंवेदनशीलता मनाला बोचणारी आहे.विभागीय आयुक्त कार्यालयाची वास्तू ही हेरिटेज आहे. त्याच्या सौंदर्यीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी यासाठी विशेष भर दिला आहे. या इमारतीत विविध विभागांची अनेक कार्यालये आहेत. या सौंदर्यीकरणाच्या कामातच अंधांसाठीसुद्धा विशेष टाईल्स लावून मार्ग तयार केला जात आहे. बहुतांश काम झालेले आहे. केवळ विभागीय आयुक्त कार्यालयात येण्यापुरता रॅम्प तयार न करता अंध व्यक्तीला इमारतीमध्ये सहज येण्यासोबतच त्याला इमारतीतील प्रत्येक कार्यालयात, विभागात सहजपणे जाता यावे, यासाठी विशिष्ट प्रकारची टाईल्स लावून मार्ग तयार केला जात आहे. या मार्गाद्वारे अंध व्यक्ती कुणाचीही मदत न घेता थेट कार्यालयात आणि शौचालयापर्यंतही जाऊ शकतात, अशी उत्तम व्यवस्था विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये केली जात आहे. याबद्दल विभागीय आयुक्तांचे विशेष कौतुकही केले जात आहे. सध्या हे काम सुरू असले तरी कर्मचाºयांनी आतापासूनच अंधांप्रति आपल्या असंवेदनशीलतेचा परिचय द्यायला सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यापैकी काही ठिकाणी त्याच बाजूला मार्गावरच साहेबांच्या कार्यालयातील शिपाई व इतर कर्मचारी खुर्च्या टाकून बसतात. त्यामुळे या मार्गाचा उपयोग अंध व्यक्ती करणार तरी कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत कर्मचाºयांशी चर्चा केली तर सध्या काम सुरू असल्याचे कारण सांगण्यात आले. परंतु ज्या ठिकाणचे काम झाले त्यावर खुर्ची टाकून बसण्याची गरज काय? अशी विचारणा केली असता त्यांच्याकडे उत्तर नव्हते. अंध-अपंगांबद्दल शासकीय कर्मचाºयांची वागणूक चांगली नसते, अशी नेहमीच ओरड होत असते. या घटनेमुळे कर्मचारी अंधांबद्दल किती संवेदनशील असतात हे दिसून येते.मुख्य उद्देशालाच हरताळअंध व्यक्तीला प्रत्येक कार्यालयात सहजपणे जाता यावे, या उद्देशासाठी अतिशय चांगले काम विभागीय आयुक्त कार्यालयात केले जात आहे. परंतु या कर्मचाºयांनी दाखविलेल्या असंवेदनशीलतेमुळे अंध व्यक्ती सहजपणे चालू शकणार नाही. त्यामुळे मुख्य उद्देशालाच हरताळ फासला जात आहे.
अंधांच्या मार्गात डोळसांचा व्यत्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:03 AM
अंध-अपंगांसाठी शासकीय इमारतींमध्ये विशेष रॅम्प तयार करण्यात यावा, अशा न्यायालयाच्या सूचना आहेत.
ठळक मुद्देविभागीय आयुक्त कार्यालय : कर्मचाºयांची अशीही असंवेदनशीलता