आशिष दुबे
नागपूर : सोमवारी मुंबई, नागपूर व राज्यातील अन्य शहरांमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भात काढलेल्या मोर्चा व संस्था संचालक मंडळाने बोर्ड परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यामुळे राज्य शिक्षण मंडळ बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार करीत आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
सूत्रांच्या मते बोर्ड परीक्षा पुढे ढकलण्याच्या विचारात आहे. पण परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. बोर्डाकडे ऑनलाईन परीक्षा घेण्यासंदर्भात यंत्रणा नाही. दुसरीकडे ऑफलाईन परीक्षेचे संपूर्ण तयारी झाली आहे. यासंदर्भात राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी व सचिव डॉ. अशोक भोसले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थी व अनुदानित शाळेच्या संस्थाचालकांचा ऑफलाईन परीक्षेला विरोध असून, अन्य संघटनादेखील बोर्डाच्या परीक्षेला विरोध करण्याच्या तयारीत आहे. बोर्ड देखील विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता, त्यांना अभ्यासासाठी वेळ देण्याच्या मानसिकतेत आहे.
- प्रॅक्टिकलवर ही बहिष्कार
अनुदानित शाळेचे संस्थाचालक संघटनेचे सचिव रवींद्र फडणवीस म्हणाले की, बोर्डाच्या प्रॅक्टिकल परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याची घोषणा करणार.