शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

बॉबी माकण अपहरण आणि हत्याकांड : ठिकठिकाणी छापामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 12:34 AM

ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकण अपहरण आणि हत्याकांडातील संशयित आरोपींच्याविरुद्ध पुराव्यांची कड्या जोडण्यात पोलीस गुंतले असून, ठिकठिकाणी पोलिसांची छापामारी सुरू आहे. पुढच्या काही तासात या खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा करण्यात येईल, असा दावा पोलीस अधिकारी करीत आहेत.

ठळक मुद्देसंशयित आरोपींच्या कड्या जुळविण्यात गुंतले पोलीस : आरोपींच्या मुसक्या आवळण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकण अपहरण आणि हत्याकांडातील संशयित आरोपींच्याविरुद्ध पुराव्यांची कड्या जोडण्यात पोलीस गुंतले असून, ठिकठिकाणी पोलिसांची छापामारी सुरू आहे. पुढच्या काही तासात या खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा करण्यात येईल, असा दावा पोलीस अधिकारी करीत आहेत.अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ज्या कारमधून बॉबीचे अपहरण करण्यात आले ती इनोव्हा कारही पोलिसांनी शोधली आहे. त्यामुळे पुढच्या काही तासात या अपहरण आणि हत्याकांडाचा खुलासा होण्याचे संकेत मिळाले आहेत.कोट्यवधींच्या मालमत्तेला अडवून ठेवणाऱ्या बॉबी माकण यांचे गुरुवारी २५ एप्रिलच्या मध्यरात्री आरोपींनी अपहरण केले. रविवारी २८ एप्रिलच्या सकाळी माकण यांचा मृतदेह कोंढाळीजवळ एका पुलाच्या खाली सापडला. हत्येनंतर त्यांच्या चेहºयावर आरोपींनी अ‍ॅसिड टाकल्यामुळे बॉबीचा चेहरा पुरता विद्रूप झाला होता. बॉबीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून प्रारंभी मिसिंगची नोंद करणाºया जरीपटका पोलिसांनी रविवारी या प्रकरणात अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर अपहरणकर्त्यांचा आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी जरीपटका, पाचपावली आणि गुन्हे शाखेची सुमारे १० पथके सहा दिवसांपासून रात्रंदिवस शोधाशोध करीत आहेत. या ६ दिवसांत पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून पवन मोर्यानी, लिटिल सरदार, मंजित वाडे, मिकी याच्यासह डझनभर आरोपींची चौकशी केली. दुसरीकडे लिटिलचा साथीदार सिटू यालाही पंजाबमध्ये जाऊन ताब्यात घेतले. त्याच्यासोबत अन्य काही गुन्हेगाराचींही पोलिसांनी चौकशी केली. ज्या इनोव्हातून बॉबीचे अपहरण करण्यात आले ती इनोव्हा कार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी रात्री एका गॅरेजमधून जप्त केली. गुन्ह्यानंतर पुरावे मिटविण्यासाठी ती गॅरेजमध्ये पाठविण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. हे तसेच आणखी काही पुरावे पोलिसांनी मिळवले आहेत. सहा दिवसांच्या चौकशीतून एक एक कडी जुळवित पोलिसांनी पुराव्यांची साखळी जोडण्याचे प्रयत्न चालविले आहे. ज्या संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. त्यातील काहींविरुद्ध पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली असून, त्याच आधारे पोलीस ठिकठिकाणी छापामारी करीत आहेत.---पोलीस पथक मुंबईतमुंबईतही एका आरोपीला जेरबंद करण्यासाठी पोलीस पथक पोहचले असून, तो हाती आल्यानंतरच पोलीस या गुन्ह्याचा उलगडा होईल, असा दावा एका अधिकाºयाने केला आहे.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर