लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रान्सपोर्टर बॉबी ऊर्फ भूपेंद्रसिंग मंजितसिंग माकण (वय ४६, रा. दीक्षितनगर) यांच्या अपहरण आणि हत्याकांडाचा उलगडा करून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांना अद्याप यश आले नसताना या प्रकरणाशी संबंधित तरुणाला तसेच त्याच्या मदतीला आलेल्या दोन पोलिसांना एका कारचालकाने धडक मारून उडवण्याचा प्रयत्न केला. सोमवारी मध्यरात्री पाचपावलीत घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.गुरुवारी २५ मे च्या मध्यरात्री अज्ञात आरोपींनी बॉबी माकण यांचे अपहरण केल्यानंतर २८ मेच्या सकाळी त्यांचा मृतदेहच कोंढाळीजवळ सापडला. या प्रकरणी रविवारी जरीपटका पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपींचा छडा लावण्यासाठी बॉबीचे विरोधक आणि मित्र या सर्वांनाच पोलीस विचारपूस करीत आहेत. मात्र, पोलिसांना ठोस असे काही मिळालेले नाही. दरम्यान, या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेची तीन तसेच पाचपावली आणि जरीपटका पोलिसांची सर्वच्या सर्व पथके आरोपींचा शोध घेत आहेत. दुसरीकडे बॉबीच्या परिवाराशी जवळीक असलेला सोनू (चिनी) हा तरुण आधीपासूनच या प्रकरणात पोलिसांच्या मदतीसाठी धावपळ करीत आहे. मंगळवारी मध्यरात्री सोनू त्याच्या घरी जात असताना काळ्या रंगाच्या कारचालकाने त्याला उडवण्याचा प्रयत्न केला. सोनू आणि त्याच्या मित्रांनी प्रसंगावधान राखत स्वत:चा जीव वाचविला. त्यांनी लगेच पाचपावली पोलिसांना ही माहिती दिली. त्यामुळे रात्रपाळीवरील पोलीस कर्मचारी राजेश देशमुख आणि त्यांचा एक सहकारी तिकडे आपल्या दुचाकीने गेले. ती कार सोनूच्या घराच्या परिसरातच चकरा मारत होती. त्यामुळे पोलिसांनी कारकडे आपली दुचाकी वळवली. ते पाहून कारचालकाने वेगात येऊन त्यांना कट मारून उडवून देण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत देशमुख यांनी दुचाकी दुसरीकडे वळविल्याने ते व त्यांचा सहकारी पोलीस कर्मचारी बचावला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. पोलीस नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून पाचपावली पोलिसांनी शहर पोलीस दलाला या घटनेची आणि कारची माहिती दिली. त्यानंतर आरोपींची शोधाशोध सुरू झाली. आज सकाळी ही कार पोलिसांना मिळाली. कारमालकाचे नाव गुप्ता असल्याचे समजते. मात्र, रात्रीच्या वेळी या कारमध्ये कोण होते, ते आज रात्रीपर्यंत स्पष्ट झाले नाही.
बॉबी माकण अपहरण-हत्याकांड : काळ्या रंगाच्या कारच्या चालकाचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 9:50 PM
ट्रान्सपोर्टर बॉबी ऊर्फ भूपेंद्रसिंग मंजितसिंग माकण (वय ४६, रा. दीक्षितनगर) यांच्या अपहरण आणि हत्याकांडाचा उलगडा करून आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांना अद्याप यश आले नसताना या प्रकरणाशी संबंधित तरुणाला तसेच त्याच्या मदतीला आलेल्या दोन पोलिसांना एका कारचालकाने धडक मारून उडवण्याचा प्रयत्न केला. सोमवारी मध्यरात्री पाचपावलीत घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देबॉबीच्या मित्रासह पोलिसांनाही मारला कट