शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

नागपुरातील बॉबी माकन अपहरण-हत्याकांडाचा उलगडा : शत्रूंनी मिळून केला गेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 7:56 PM

उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडाचा उलगडा करण्यात अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यश मिळविले. याप्रकरणी कुख्यात गुंड लिटिल सरदार ऊर्फ शैलेंद्रसिंग, त्याचा बॉडीगार्ड आणि अन्य दोघे अशा चौघांना पोलिसांनी अटक केली असून, अपहरणानंतर बॉबीचा गळा आवळून ठार मारणारा कुख्यात गुंड मंजित वाडे त्याच्या काही साथीदारांसह फरार झाला. शहर पोलीस दलासाठी या प्रकरणाचा तपास प्रतिष्ठेचा विषय ठरला होता, हे विशेष!

ठळक मुद्देकुख्यात लिटिल सरदारसह चार गजाआड : कुख्यात मंजित वाडेसह अनेक फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत खळबळ उडवून देणाऱ्या ट्रान्सपोर्टर भूपेंदरसिंग ऊर्फ बॉबी माकन अपहरण आणि हत्याकांडाचा उलगडा करण्यात अखेर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यश मिळविले. याप्रकरणी कुख्यात गुंड लिटिल सरदार ऊर्फ शैलेंद्रसिंग, त्याचा बॉडीगार्ड आणि अन्य दोघे अशा चौघांना पोलिसांनी अटक केली असून, अपहरणानंतर बॉबीचा गळा आवळून ठार मारणारा कुख्यात गुंड मंजित वाडे त्याच्या काही साथीदारांसह फरार झाला. शहर पोलीस दलासाठी या प्रकरणाचा तपास प्रतिष्ठेचा विषय ठरला होता, हे विशेष! 

शहर पोलीस दलासाठी  प्रतिष्ठेचा विषय ठरलेल्या या गुन्ह्याचा छडा लावल्यानंतर सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी आज शनिवारी सायंकाळी पत्रकारांना या संबंधाने माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर, गुन्हे शाखेचे उपायुक्त नीलेश भरणे तसेच सहायक आयुक्त सुधीर नंदनवार आणि गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या पथकाचे पोलीस निरीक्षक नरेंद्र  हिवरे तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते. गुन्ह्याच्या छड्याची माहिती देताना सहआयुक्त कदम यांनी सांगितले की, गुरुवारी २५ एप्रिलच्या मध्यरात्री आरोपींनी बॉबी माकन यांचे अपहरण केले होते. दुसऱ्या  दिवशी त्यांची कार बेवारस अवस्थेत घरापासून काही अंतरावर आढळली. त्यामुळे २६ एप्रिलच्या दुपारी बॉबीच्या पत्नीने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदविली होती. जरीपटका पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता मिसिंगची नोंद घेतली आणि प्रकरण थंडबस्त्यात टाकले. २८ एप्रिलला बॉबीचा मृतदेह कोंढाळीजवळ सापडला. त्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. जरीपटका पोलिसांनी अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर अपहरणकर्त्यांचा आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी जरीपटका, पाचपावली आणि गुन्हे शाखेची सुमारे १० पथके शोधाशोध करीत आहेत. बॉबीच्या अपहरणाला आठ दिवस होऊनही कोणताच ठोस पुरावा हाती न लागल्यामुळे उपराजधानीत पोलिसांच्या तपासाबाबत कुजबूज वाढली होती. दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून पवन मोरयानी, लिटिल सरदार, मंजित वाडे याच्यासह डझनभर आरोपींची चौकशी केली. लिटिलचा साथीदार सिटू यालाही पंजाबमध्ये जाऊन ताब्यात घेतले. मात्र, हे सर्वच्यासर्व कुख्यात गुन्हेगार असल्याने आणि पोलिसांच्या चौकशीचा त्यांनी अनेकदा सामना केला असल्याने ते अपहरण आणि हत्येचा स्पष्ट शब्दात इन्कार करीत होते. पोलिसांनाच ते आमच्याविरुद्ध कोणते पुरावे आहेत, त्याबाबत विचारणा करीत होते. संशय जरी असला तरी पक्का पुरावा नसल्याने पोलिसांचीही गोची झाली होती. त्यामुळे पोलीस या प्रकरणात ठोस पुराव्यांसह नवख्या आरोपीला शोधण्यासाठी धावपळ करीत होते.अखेर धागा मिळालारात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या  गुन्हे शाखेच्या पोलिसांना दोन दिवसांपूर्वी अखेर एक धागा मिळाला. ज्या इनोव्हातून बॉबीचे अपहरण करण्यात आले ती इनोव्हा कार कुणाची होती, ती कुणाकडे होती आणि कुणी तिला अपहरणासाठी नेले, ती नावे पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी बुधवारी रात्री एका गॅरेजमधून ही पांढरी इनोव्हा कार जप्त केली. कारची खरेदी-विक्री करणाऱ्याने ही कार कुणी नेली होती, त्याचे नाव पोलिसांना सांगितले. त्याच दिवशी बॉबी माकनचे अपहरण केल्यानंतर त्याची कार घराजवळ सोडली होती, तो हनी चंडोक पोलिसांना ट्रेस झाला. त्याला मुंबईतून ताब्यात घेतल्यानंतर त्याने या अपहरणाचा खुलासा करतानाच आरोपींची नावेही पोलिसांना सांगितली. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांनी कुख्यात लिटिल सरदार, त्याचा बॉडीगार्ड सिटू गौर, बाबू खोकर आणि हनी चंडोकला अटक केली. अन्य आरोपी फरार आहेत.लिटिलच मास्टर माईंडया अपहरण आणि हत्याकांडाचा मास्टर माईंड लिटिल सरदार आहे. त्यानेच बॉबीच्या अपहरण आणि हत्याकांडाचा कट रचला. त्यानेच गुन्हेगारांची जमवाजमव केली. मात्र, बॉबीची हत्या गळ्यात कंबरपट्ट्याचा फास टाकून कुख्यात मंजित वाडेने केली. लिटिलवर दोन वर्षांपूर्वी फायरिंग झाली होती. त्याला तीन गोळ्या लागल्या होत्या. यापैकी लिटिलच्या घुटण्यात एक गोळी अजूनही फसून आहे. त्यानंतरही बॉबीच्या हत्येची सुपारी दहा लाखात बॉबीने घेतल्याची चर्चा होती. यामुळेच लिटिलने हा कट रचला. तर, मंजित वाडे याचे लिटिलसोबत यापूर्वीही एका हत्याकांडात आरोपी म्हणून नाव आले होते. मात्र, त्यावेळी त्याने आपले नाव काढून घेण्यात यश मिळवले होते. मंजितचा बॉबीसोबत आर्थिक आणि व्यावसायिक वाद होता. त्यामुळे तो बॉबीवर संतापून होता.

टॅग्स :MurderखूनArrestअटक