लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुडकेश्वरमधील एका वृद्धासह तिघांचे मृतदेह विविध भागात आढळून आले. हुडकेश्वरमधील अवधूतनगरात राहणारे धन्नासिंग लखनसिंग किराड (वय ६०) हे आज मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यांचा मुलगा शंभूसिंग धन्नासिंग किराड (वय ३५) पोलीस दलात कार्यरत आहे. ते अजनीतील पोलीस वसाहतीत राहतात. त्यांनी दिलेल्या सूचनेवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.अशाच प्रकारे जितलाल दयाराम मडावी (वय ५०) यांचा मृतदेह रतन सिटी हुडकेश्वरमधील झोपड्यात आढळला. मडावी मंडीटोला (ता. सडकअर्जुनी, जि. गोंदिया) येथील मूळनिवासी असून, रोजगाराच्या निमित्ताने ते रतन सिटीच्या बांधकामस्थळी बांधलेल्या मजुरांच्या झोपड्यात राहत होते. आज सकाळी ते निपचित पडून असल्याचे बाजूच्या मजुरांना दिसले. त्यांनी मडावींना उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी मडावींना मृत घोषित केले. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.तिसरी घटना कळमन्यातील आहे. बबलू ऊर्फ सरोज गंगाराम खोब्रागडे (वय ४०) यांचा मृतदेह कळमना मार्केटच्या गेटसमोर असलेल्या आॅरेंज सिटी बारजवळ आढळला. खोब्रागडे मूळचे बालाघाट, कटंगी (मध्यप्रदेश) येथील निवासी होते. सध्या ते इंदोरा परिसरात राहत होते. सिद्धांत संजय खोब्रागडे (वय २९) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.