शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

शनिवारी कुवैतला रवाना होणार बोईंग-७७७; १ ऑक्टोबरला दुसरे विमान येणार

By मोरेश्वर मानापुरे | Published: September 26, 2023 10:48 PM

टॅक्सी-वे अद्ययावत होण्याची अपेक्षा

नागपूर : मिहान-सेझ परिसरातील एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लि.च्या (एआयईएसएल) एमआरओमध्ये १५ सप्टेंबरला आलेले कुवैत एअरलाइन्सचे बोईंग-७७७-३०० ईआर विमानाची दुरुस्ती अंतिम टप्प्यात आहे. देशातील एआयईएसएलच्या सर्व एमआरओमध्ये मेजर चेककरिता पहिले विदेशी विमान नागपुरात आले आहे.

एमआरओला एफएए प्रमाणपत्र मिळाले आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर एआयईएसएलच्या चमूने नागपूर एमआरओमधील सुविधांची माहिती दिली होती. त्यानंतर कुवैत एअरलाइन्सने यात रूची दाखविली आणि चार विमानांची देखभाल व दुरुस्तीचा कंत्राट दिला. विदेशी विमानाला मेजर चेककरिता एमआरओपर्यंत आणण्याच्या कामात एआयईएसएलने एएआय, कस्टम्स, एमएडीसी, एमआयएल आणि डीसी-एसईझेडचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. शनिवारी एआयईएसएलचे कार्यकारी संचालक अनिल कुमार कपूर यांच्या हस्ते पहिले कुवैती विमान रवाना करण्यात येणार आहे. त्यानंतर कुवैत एअरलाइन्सचे दुसरे बोईंग-७७७ विमान १ ऑक्टोबरला मेजर चेकसाठी नागपुरात उतरणार आहे. या विमानाची प्रवाशी संख्या ३५० एवढी आहे.टोईंगने प्रतिमा खराबडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते एमआरओपर्यंत जुळलेल्या टॅक्सी-वे वरून देखभाल व दुरुस्तीसाठी येणाऱ्या विमानाला अद्यापही पॉवर टॅक्सिंग करता आलेले नाही. शिवणगांवचे गेट असल्याने टॅक्सी-वे ऑपरेशनल एरियात सामील झालेले नाही. गेल्या सात वर्षांपासून हीच स्थिती आहे. यामुळे घरगुती विमानाची देखभाल व दुरुस्तीसाठी काम चालू शकते, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुविधांसाठी एमआरओची प्रतिमा खराब होत आहे.