लोकमत न्यूज नेटवर्कवसीम कुरैशीनागपूर : १९६० च्या दशकात हवाई वाहतुकीत आघाडीवर असणारे बोईंग-७०७ ने व्यावसायिकरीत्या उड्डाण भरल्यानंतर ३० वर्षांपूर्वीच ताफ्यातून बाहेर काढण्यात आले. भारतात एअर इंडियाच्या ताफ्यात या विमानाचा प्रवेश १९६५ मध्ये झाला होता. उत्पादक कंपनी बोईंगने १९८५ मध्ये विमानाला स्क्रॅप करण्यास सांगितले होते. आता एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडने (एआयईएसएल) उडण्याकरिता सक्षम बनविले आहे.गेल्या वर्षी या विमानाला पूर्णत: नवीन आणि उड्डाणासाठी सक्षम बनविण्यासाठी एआयईएसएलने बोईंगकडून इंजिनिअरिंग टीम मागितली होती. कंपनीने टीम देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आव्हान म्हणून एआयईएसएलने विमान तयार केले आहे. त्याचे मॅन्युअलही एआयईएसएलने बनविले आहे. ५० प्रेशर सायकल अथवा सामान्यरीत्या त्याच्या उड्डाणानंतर मेन्टेन करण्यात येत आहे. सुरक्षेच्या कारणांनी याच्या उपयोगाच्या विषयातील माहितीचा खुलासा करण्यात आलेला नाही. हे विमान जानेवारी २०२० पासून निरंतर उड्डाण करीत आहे.विमान जुने असल्याने सुटेभाग उपलब्ध नव्हते, शिवाय उत्पादकाची तांत्रिक मदतही नव्हती. मुंबई एमआरओमध्ये दोन बोईंग ७०७ विमान उभे होते. त्यातील एकाची स्थिती खराब होती. त्याचे पार्ट दुसऱ्या विमानाला तयार करण्यासाठी उपयोगात आणण्यात आले. त्याला पेंटिंग करून नवीन बनविण्यात आले. नागपूर एमआरओचे कार्यरत चार अभियंते ७०७ च्या रिस्ट्रक्चरिंग करणाऱ्या १० अभियंत्यांमध्ये सहभागी होते.
विशेष दक्षतेने केले कामएआयईएसएल बोईंग-७०७ व्यतिरिक्त आऊटडेटेड होत असलेल्या ७३७ आणि ७४७ विमानांच्या मेन्टेनन्समध्ये उत्तम काम करीत आहे. याकरिता विशेष दक्षतेवर लक्ष देण्यात येत आहे. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगशी जुळलेली अनेक आव्हाने असतात.- एच. आर. जगन्नाथ, सीईओ, एआयईएसएल.