शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

बोर्इंगचे इंजिन २०१९ मध्ये नागपुरात तयार होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:19 AM

बोर्इंग-७७७ आणि ७८७ विमानाचे इंजिन वर्ष २०१९ च्या अखरेपर्यंत नागपुरात तयार होणार आहे. याकरिता मिहानमधील एअर इंडियाच्या एमआरओमध्ये देखरेख, दुरस्तीसह जोडणीवर भर देण्यात येत आहे.

ठळक मुद्देएअर इंडिया एमआरओ दुसऱ्या टेस्ट हाऊसचे बांधकाम सुरू

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बोर्इंग-७७७ आणि ७८७ विमानाचे इंजिन वर्ष २०१९ च्या अखरेपर्यंत नागपुरात तयार होणार आहे. याकरिता मिहानमधील एअर इंडियाच्या एमआरओमध्ये देखरेख, दुरस्तीसह जोडणीवर भर देण्यात येत आहे.बोर्इंग कंपनीच्या या दोन मॉडेलच्या विमानाचा जगात व्यावसायिक उपयोगासाठी जास्त वापर होतो. देशातही बोर्इंगच्या विमानाचे मार्केट आहे. त्यांच्या ओव्हरहॉलकरिता अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिकसोबत (जीई) एअर इंडिया एमआरओने करार केला आहे. जीईने एमआरओमध्ये बोर्इंग-७७७ चे जीई-९० इंजिन टेस्टिंगकरिता पाठविले होते. त्याचे यशस्वीरीत्या टेस्टिंग करण्यात आले.बोर्इंग-७७७ विमानाच्या इंजिनच्या (जीई-९०) टेस्टिंगसाठी डायरेक्टर जनरल आॅफ सिव्हील एव्हिएशनकडून (डीजीसीए) मंजुरी मिळाली आहे. याशिवाय या इंजिनची दुरुस्ती आणि देखभाल आणि जोडणीकरिता डीजीसीएकडून परवानगी अद्याप मिळालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीजीसीएची चमू एमआरओचे आॅडिट करणार आहे. त्यानंतर एमआरओला या इंजिनचे ओव्हरहॉल व जोडणीची मंजुरी मिळणार आहे. डीजीसीएपूर्वी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (एआयइएसएल) अंतर्गत आॅडिट करणार आहे.बोर्इंगच्या दोन्ही विमानांच्या इंजिनसाठी एप्रिल-२०१९ पर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच या ठिकाणी बोर्इंग-७८७ च्या जेनएक्स इंजिनची टेस्टिंग सुरू करण्यात येईल. एआसईएसएलच्या अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाच ते सहा इंजिनच्या टेस्टिंगनंतर जीई कंपनी एअर इंडिया एमआरओला व्यवसाय देणे सुरू करेल. जीई इंजिनचे सुटे भाग येथे पाठविणार आहे. त्यानंतर इंजिन तयार होतील आणि टेस्टिंग व ओव्हरहॉल होईल.

हँगर निर्मितीचे काम संथएमआरओमध्ये दुसऱ्या टेस्ट सेलच्या हँगरचे कामाची गती संथ आहे. हे काम फेब्रुवारी २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. आता हे काम एप्रिल २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहे. अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिकच्या (जीई) भागीदारीत टेस्ट हाऊसचे बांधकाम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान