शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

बोगस डॉक्टरने रुग्णाकडून उकळले १२ हजार रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 9:50 PM

Nagpur News कॅन्सरच्या रुग्णावर तातडीने उपचार करतो, असे म्हणून रुग्णाच्या नातेवाईकाकडून १२ हजार रुपये उकळणाऱ्या बोगस डॉक्टरला ‘एमएसएफ’च्या जवानाने दोन दिवसात मोठ्या शिताफीने पकडले.

ठळक मुद्दे‘एमएसएफ’ जवानाच्या सतर्कतेमुळे दोन दिवसात ‘त्या डॉक्टर’ला पकडले

नागपूर : कॅन्सरच्या रुग्णावर तातडीने उपचार करतो, असे म्हणून रुग्णाच्या नातेवाईकाकडून १२ हजार रुपये उकळणाऱ्या बोगस डॉक्टरला ‘एमएसएफ’च्या जवानाने दोन दिवसात मोठ्या शिताफीने पकडले. मेडिकलमधील या घटनेने मात्र, रुग्ण व डॉक्टरांमध्ये खळबळ उडाली आहे.

गरिबांवरील उपचारासाठी आशेचा किरण असलेल्या मेडिकलमध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा येथून रुग्ण येतात. बाहेरगावावरून येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाची माहिती नसल्याने याचा फायदा समाजविघातक घेत असल्याचे अनेक प्रकार आतापर्यंत समोर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार, पुष्पा नावाच्या महिलेच्या पतीला जबड्याचा कर्करोग झाल्याने २ ऑक्टोबर रोजी ती पतीला घेऊन मेडिकलला आली. डॉक्टरांनी तपासून कर्करोगाच्या वॉर्डात भरती केले. यादरम्यान निवासी डॉक्टरांचा संप सुरू होता. याचा फायदा घेत स्वप्नील नावाच्या व्यक्तीने स्वत: डॉक्टर असल्याचे सांगत रुग्णाच्या पत्नीला विश्वासात घेतले. रुग्णाच्या विविध तपासण्या कराव्या लागतील, असे सांगून यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली. पत्नीने कर्ज काढून आणलेले १२ हजार ५०० रुपये स्वप्नीलला दिले. त्या दिवशी त्याने मेडिकलमध्येच त्या रुग्णाचे सिटी स्कॅन केले आणि नंतर गायब झाला. दोन दिवस होऊनही तो डॉक्टर दिसून न आल्याने रुग्णाच्या पत्नीला आपली लुबाडणूक झाल्याचे समजून आले.

तिने मेडिकलच्या ‘महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स’चा (एमएसएफ) जवान अंकुश खानझोडे यांच्याकडे याविषयी तक्रार केली. खानझोडे यांनी याची माहिती नागपूर ‘एमएसएफ’चे सहसंचालक किशोर पाडवी यांना दिली. त्यांनी सुरक्षा पर्यवेक्षक संजय पाटमासे, जवान सागर एकोटखाणे व अंकुश खानझोडे यांना त्या बोगस डॉक्टरवर पाळत ठेवण्याचा सूचना दिल्या. ४ ऑक्टोबर रोजी तो बोगस डॉक्टर पुन्हा मेडिकलमध्ये आला. खानझोडे व एकोटखाने यांची नजर त्याच्यावर पडताच त्याला पकडून ‘एमएसएफ’च्या कार्यालयात आणले. त्याने रुग्णाच्या नातेवाईकाची लुबाडणूक केल्याचे लेखी लिहून दिले. सोबतच नातेवाईकाला पैसेही परत दिले. सुरक्षा रक्षकांनी रुग्णाच्या नातेवाईकाला बोगस डॉक्टरविरुद्ध पोलिसात तक्रार करण्यास सांगितले. परंतु सोबत इतर नातेवाईक नसल्याने महिलेने तक्रार करण्यास नकार दिला.

- सुरक्षा रक्षकाने सतर्क राहायला हवे

मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले, सुरक्षा रक्षकाने सतर्क राहिल्यास अशा अनेक घटनांना आळा बसू शकेल. ‘एमएसएफ’चा जवान अंकुश खानझोडे व सागर एकोटखाणे यांच्या सतर्कतेमुळे बोगस डॉक्टरला पकडण्यात यश आले. या दोघांचा मेडिकलतर्फे सत्कार केला जाईल, असेही डॉ. गुप्ता म्हणाले.

टॅग्स :fraudधोकेबाजीdoctorडॉक्टर