लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एक्साईज अधिकारी सांगून ५० लाख ६५ हजार १८० रुपयांनी एका व्यापाऱ्याला ठगविल्याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बोगस एक्साईज अधिकाऱ्याने आपल्या तीन नातेवाईकासोबत संगनमत करून गेल्या दोन वर्षापासून व्यापाऱ्याची फसवणूक करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हुडकेश्वर रोड, रेणुका माता मंदिर येथील रहिवासी मंगेश रघुनाथ थोटे (४२) याने ओमनगर, रनाळा, कामठी येथील नातेवाईक मुकेश थोटे व रोहित रेवतकर यांच्याशी संगनमत करून, जुनी मंगळवारी, सीए रोड येथील गुप्तराज शालिकराम पाटील (५८) या व्यापाऱ्याशी संपर्क केला. त्यांच्या सदर येथील कार्यालयाचे एक्साईज रिबेटचे ३६ बिल एक्साईज विभागाला सादर न करता घरीच ठेवून ५०,६५,१८० रुपयांचे नुकसान केले. तसेच एक्साईज विभागाची बनावट पोचपावती व सहआयुक्तांचे बनावट पत्र तयार करून खोटी सही शिक्के घेऊन कार्यालयामध्ये सादर केले. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोगस एक्साईज अधिकाऱ्याने ५० लाखाने व्यापाऱ्याला ठगविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 1:42 AM
एक्साईज अधिकारी सांगून ५० लाख ६५ हजार १८० रुपयांनी एका व्यापाऱ्याला ठगविल्याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बोगस एक्साईज अधिकाऱ्याने आपल्या तीन नातेवाईकासोबत संगनमत करून गेल्या दोन वर्षापासून व्यापाऱ्याची फसवणूक करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
ठळक मुद्देदोन वर्षांपासून करीत होता फसवणूक