लाेकमत न्यूज नेटवर्क
काेराडी : बाेलेराेसह राेख रक्कम व माेबाईल हॅण्डसेट चाेरून नेणाऱ्या चाेरट्यांना काेराडी पाेलिसांनी अटक केली आणि त्यांच्याकडून त्यांनी चाेरून नेलेला मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आराेपींमध्ये एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
सोहेल शरीफ कुरेशी (२४, रा. गड्डीगोदाम, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. महेश मेश्राम (२४, रा. बिना संगम, ता. कामठी) हा गुरुवारी (दि. २१) विटा आणण्यासाठी कवठा येथून उप्पलवाडी येथे एमएच-३१/एडी-११६९ क्रमांकाच्या बाेलेराेने जात हाेता. दरम्यान, साेहेल व त्याच्यासाेबत असलेल्या विधिसंघर्षग्रस्त बालकाने त्याचा एमएच-३१/एफके-२९१८ क्रमांकाच्या माेटरसायकलने पाठलाग केला. या दाेघांनीही बाेलेराेला माेटरसायकल आडवी करून महेशला वाटेत अडविले. त्यांनी महेशकडून बाेलेराे, ३५ हजार रुपये राेख व माेबाईल हॅण्डसेट हिसकावून घेत पळ काढला.
घटनेनंतर महेशने लगेच काेराडी पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. पाेलिसांनी भादंवि ३९२ अन्वये गुन्हा नाेंदवून प्रकरण तपासात घेतले. ही बाेलेराे साेहेलने पळविल्याचे स्पष्ट हाेताच काेराडी पाेलिसांनी त्याला व त्याच्यासाेबत असलेल्या विधिसंघर्षग्रस्त बालकास नागपूर शहरातून ताब्यात घेत चाैकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली देताच अटक केली आणि त्याच्याकडून बाेलेराे, ३५ हजार रुपये राेख, माेबाईल हॅण्डसेट आणि गुन्ह्यासाठी वापरलेली माेटरसायकल जप्त केली. न्यायालयाने त्याला न्यायालयीन काेठडी सुनावल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेश पुकळे यांच्या मार्गदर्शनात जयंत गंगावणे, इजराइल शरीफ, गोपाल वैद्य, सुभाष वासाडे, सुभाष दुपारे, सुरेश बर्वे, किशोर ठाकरे, अनिल जाधव, राहुल कुसरामे, दिनेश महल्ले व स्नेहल बेलसरे यांच्या पथकाने केली.