वानाडाेंगरी नगर परिषद प्रशासनाने शहरातील सुभान नगरात सांडपाण्याच्या नालीचे बांधकाम हाती घेतले असून, त्याचे कंत्राट दिले आहेत. याच भागात राेडजवळ बाेअरवेल हाेता. नागरिक राेज या बाेअरवेलचे पाणी पिण्यासाेबत इतर कामांसाठी वापरायचे. शहरात सध्या चार दिवसाआड पाणीपुरवठा हाेत असल्याने सुभान नगरातील नागरिकांची पाण्याची गरज हा बाेअरवेल भागवायचा. कंत्राटदाराने नालीच्या बांधकामासाठी जेसीबीने खाेदकाम करताना ही बाेअरवेल उपटून फेकली.
हा प्रकार लक्षात येताच नागरिकांमध्ये असंताेष निर्मण झाला. नालीचे बांधकाम चुकीच्या दिशेने व पद्धतीने करण्यात येत असल्याचा आराेपही या भागातील नागरिकांनी केला. पालिका प्रशासनाने या कंत्राटदारावर कारवाई करीत बाेअरवेल पूर्ववत करून द्यावी, अशी मागणी किरण कनेरे, रेखा आमदरे, माया गभणे, उषा बाेरकुटे, अर्चना राजधरकर, राेशन वानखेडे, युवराज गाेखले, चंद्रशेखर ढाले, कमलाकर पाटील, राजू नलगे, महेंद्र देशमुख, राहुल माेहाेड, रवींद्र वानखेडे, सुरेश झाडे, विनाेद इंगळकर, ओमकार धाराकर, चंद्रप्रकाश बाेरकर, जयप्रकाश वंजारी, राहुल बाेरकुटे रमेश साेनुले यांच्यासह नागरिकांनी केली असून, आंदाेलनाचा इशारा दिला आहे.