शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By admin | Published: October 29, 2015 3:27 AM

स्टिंग आॅपरेशन करून ब्लॅकमेल करीत एका होमिओपॅथी डॉक्टरला पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज ...

स्टिंग आॅपरेशन करून डॉक्टरला खंडणी मागण्याचे प्रकरणनागपूर : स्टिंग आॅपरेशन करून ब्लॅकमेल करीत एका होमिओपॅथी डॉक्टरला पाच लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादिक यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. अजय बद्रीनारायण सोनी आणि विवेक वसंता तातेकर (४४) रा. रेशीमबाग, अशी आरोपींची नावे आहेत. हा गुन्हा उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. उमरेडच्या जोगीठाणा पेठ येथील रहिवासी डॉ. अरविंद राधेश्याम पंडित (५१) यांचे इतवारी पेठ येथे ‘राधे हॉस्पिटल’ आहे. पंडित हे होमिओपॅथी डॉक्टर आणि जनरल फिजिशियन आहेत. आरोपींपैकी अजय सोनी हा ‘फार्मशी टाइम्स’ नावाच्या साप्ताहिकाचा संपादक आहे. विवेक तातेकर हा गांधीबाग येथे होलसेल औषध विक्रीचे दुकान चालवितो. डॉ. अरविंद पंडित यांच्या तक्रारीवरून या दोन्ही आरोपींविरुद्ध २५ जुलै २०१५ रोजी उमरेड पोलीस ठाण्यात भादंविच्या ३८४, ५०१, ५०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल होण्याच्या दीड महिन्यापूर्वी अजय सोनी याने ‘डमी पेशंट’ कल्याणी वाघ नावाच्या तरुणीला डॉ. पंडित यांच्या इस्पितळात दाखल करून स्टिंग आॅपरेशन केले होते. त्याने छायाचित्रे घेतली होती. पंडित हे बोगस डॉक्टर आहेत, हे दाखवण्यासाठी त्याने आपल्या साप्ताहिकात वृत्त प्रकाशित केले होते. नंतर पुन्हा हे वृत्त प्रकाशित न करण्यासाठी त्याने पंडित यांना ५ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. अजय सोनी याने ९ जुलै २०१५ रोजी प्रसिद्ध होणारी बातमी अरविंद पंडित यांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि त्यांची बदनामी करण्यासाठी ५ जुलै रोजीच अरविंद पंडित यांचे बंधू संजीव पंडित यांच्या वॉटस्अपवर आपल्या अन्य साथीदारांमार्फत पोस्ट केली होती.संजीव पंडित यांचेही उमरेड येथे पूजा मेडिकल स्टोअर्स या नावाने औषधांचे दुकान आहे. या शिवाय अरविंद पंडित यांची बदनामी करणारी छायाचित्रे आणि वृत्ताची कात्रणे अजय सोनी याने त्यांचे नजीकचे सहकारी डॉ. आकाश बल्की यांच्या वॉटस्अपवर पोस्ट केले होते. आरोपी अजय सोनी आणि विवेक तातेकर हे एकमेकांना चांगले ओळखतात. तातेकरच्या मोबाईलवर आरोपी अजय, तातेकर आणि डॉ. अरविंद पंडित यांचे बंधू विजय यांच्यात पैशाच्या मागणीसाठी झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग आणि कॉल रेकॉर्ड पोलिसांनी प्राप्त केले आहेत. (प्रतिनिधी)डॉक्टरला ब्लॅकमेल करणारा सराईत गुन्हेगारउमरेड येथील होमिओपॅथी डॉक्टर अरविंद पंडित यांना पाच लाखांच्या खंडणीसाठी ब्लॅकमेल करणारा अजय सोनी हा सराईत गुन्हेगार असल्याचा अभिलेख उमरेड पोलिसांनी न्यायालयात दाखल केला. अजय सोनी याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. भिसी पोलीस ठाण्यात भादंविच्या ३८४, ३४ कलमान्वये, कोतवाली पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२०, ३४ कलमान्वये दोन गुन्हे दाखल आहेत. राजापेठ पोलीस ठाण्यात भादंविच्या ४२० कलमान्वये, अजनी पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये, तहसील पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये तसेच चेक बाऊंसची २२ प्रकरणे दाखल आहेत. सोनीने २०१० मध्ये डॉ. राजेंद्र जावरकर यांना ब्लॅकमेल करून ५० हजाराच्या खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणात मुख्य सूत्रधार कोण आहे, खंडणी वसूल करून पैशाचे वाटप कसकसे होत होते, डमी पेशंट कल्याणी वाघ हिचाही या आरोपींच्या मदतीने शोध घेणे असल्याने आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावे, अशी विनंती तपास अधिकारी उपनिरीक्षक विलासकुमार सानप यांनी न्यायालयाला केली असता, प्रकरण गंभीर असल्याने या दोघांचेही अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले.