कमलेश वानखेडे- नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनता महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही कंटाळली आहे. भाजप काँग्रेस एकच आहेत, अर्थकारणात काही बदल झालेला नाही. - आम्ही मुद्द्यावर लोकांना घेऊन जाऊ. आघाडी आणि युती दोघांचाही एन्काऊंटर करणार. ४ नोव्हेंबरला महाशक्ती राजकीय स्फोट करणार, असा इशारा प्रहारचे नेते आ. बच्चू कडू यांनी दिला.
नागपुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना आ. कडू म्हणाले, ४ नोव्हेंबरला स्पष्ट होईल. चांगले उमेदवार आणि चांगले मतदारसंघ आमच्याकडे आलेले दिसतील. अर्ज मागे घेतल्यानंतरच पिक्चर क्लिअर होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांना पहिले पडायचे आहे. जसे इतर पडतात तसे मोठे नेतेही पडतील. जरांगे पाटील संबंधात माझे काही बोलने झालेले नाही. माझ्या मतदारसंघातील लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि मी तिथूनच लढणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्ययमंत्र्यांशी माझी चर्चा झाल्याची बातमी वृत्तवाहिन्यांनी दाखवली. मात्र, मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलोच नव्हतो. त्या दिवशी हैद्राबादमध्ये होतो, असा दावाही आ. कडू यांनी केला.