लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन्ही लसी परिणामकारक आहेत. परंतु शासनाकडून नागपूर शहर व जिल्ह्यात प्रामुख्याने कोविशिल्डचा पुरवठा होत आहे. कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. कोव्हॅक्सिन महिन्यातून दोनदा उपलब्ध होत आहे, तर कोविशिल्ड आठवड्यातून दोनदा उपलब्ध होत आहे. यामुळे नागपुरातील १०५ केंद्रांवर कोविशिल्डचा डोस दिला जात आहे, तर फक्त तीन केंद्रांवर कोव्हॅक्सिन दिली जात आहे.
...
उपलब्ध असल्याने कोविशिल्ड
कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोविशिल्डचा पुरवठा अधिक आहे. कोव्हॅक्सिन नागपूर शहरात तीनच केंद्रांवर दिली जात आहे, तर कोविशिल्ड शहरातील १०५ केंद्रांवर दिली जात आहे. प्रामुख्याने कोविशिल्ड उपलब्ध असल्याने ही लस दिली जात आहे.
....
कोव्हॅक्सिन तीन केंद्रांवर उपलब्ध
४५ वर्षांवरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व महाल येथील मनपाच्या स्व. प्रभाकर दटके रोगनिदान केंद्र येथे उपलब्ध आहे. तसेच ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस मेडिकल कॉलेज व स्व. प्रभाकर दटके रोगनिदान केंद्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
....
कोविशिल्डचा दर आठवड्यात पुरवठा होत आहे, तर कोव्हॅक्सिन महिन्यातून दोनदा उपलब्ध होत आहे. शासनाकडून कोविशिल्डचा अधिक साठा उपलब्ध होत असल्याने शहरातील १०५ केंद्रांवरून ही लस दिली जात आहे. तर कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी असल्याने शहरातील फक्त तीन केंद्रांवरून ही लस दिली जात आहे.
डॉ. संजय चिलकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी मनपा
....
-एकूण लसीकरण - ५४८८७८
कोविशिल्ड -४९०१८८
कोव्हॅक्सिन -३६०४६
वयोगटानुसार लसीकरण (ग्राफ) (१९ जूनपर्यंत )
कोविशिल्ड पहिला डोस दुसरा डोस कोव्हॅक्सिन पहिला डोस दुसरा डोस
आरोग्य कर्मचारी - ३९९५६ २०१४१ ६१०२ ४३१३
फ्रंट लाईन - ५०८९० १८९१८ २३६२ २२६९
१८ ते ४४ - १३२४२ ४२ ५१३४ ७०८१
४५ ते ५९ - १३६७३८ २८६७३ ५९६४ ५०२३
४५ प्लस कोमाबिंड ७८१३८ १४९३६ ५७७२ ५०७२
६० वर्षांवरील - १७०२२४ ७२९८७ १०७२० ८३१९