लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बॉक्सिंग या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरातील विभागीय क्रीडा संकुल परिसरात बॉक्सिंग अकॅडमी सुरू करण्यात येऊन खेळाडूंना बॉक्सिंगसोबतच इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.राज्यातील खेळाडू व खेळांच्या विविध प्रकाराला प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनाच्या वर्ग-१ व वर्ग- २ या पदावर ३२ खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे खेळाकडे एक करिअर म्हणून पाहण्यास सुरुवात करा. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळवून राज्याचा व देशाचा लौकिक वाढवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.राणीकोठी सिव्हिल लाईन्स येथे नागपूर महानगरपालिका व नागपूर महानगर बॉक्सिंग असोसिएशन, बॉक्सिंग फेडरेशन आॅफ इंडिया यांच्या वतीने सब ज्युनियर गर्ल्स नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजयी खेळाडूंचा मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्या हस्ते पदक देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार सुधाकर कोहळे, लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त रवींद्र ठाकरे, दयाशंकर तिवारी, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड उपस्थित होते.एशियाड व आॅलिम्पिक स्पर्धेच्या तयारीला सुरुवातमहाराष्ट्रातून एशियाड व आॅलिम्पिकच्या सन २०२० व २०२४ या स्पर्धांसाठी देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली असून यासाठी खेळाडूंना आवश्यक सुविधा देण्यात येईल. आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे आगामी स्पर्धांमध्येही राज्यातून सर्वाधिक पदकविजेते खेळाडू राहतील, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त.
नागपुरात होणार बॉक्सिंग अकॅडमी : मुख्यमंत्र्यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 11:05 PM
बॉक्सिंग या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरातील विभागीय क्रीडा संकुल परिसरात बॉक्सिंग अकॅडमी सुरू करण्यात येऊन खेळाडूंना बॉक्सिंगसोबतच इतर खेळांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ठळक मुद्देराज्यातील ३२ खेळाडूंना शासकीय सेवेत नियुक्ती