नागपूर : मुलाच्या दुचाकीवर नातवासह जात असलेल्या एका महिलेला भरधाव ट्रकची जोरदार धडक बसली. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. तिच्यासोबत असलेला तिचा नातू तसेच लघुशंकेला गेलेला मुलगा बचावला. डिफेन्स वसाहतीत राहाणारे गणेश रामभाऊ बावने (वय २९) स्प्लेंडर मोटरसायकलने आई उषाताई (वय ५०) तसेच मुलगा आर्यन (वय ५) याच्यासह शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता सुगतनगरातून डिफेन्सकडे जात होते. गिट्टीखदान हद्दीत सेंटर पॉईंट शाळेसमोर त्यांनी लघुशंकेकरिता आपली दुचाकी थांबवली. आर्यन आणि उषाबाई हे दुचाकीजवळ थांबले. अचानक भरधाव आलेल्या ट्रक (एमएच २२/ एन २४२१) च्या चालकाने त्यांना जोरदार धडक मारली. त्यामुळे उषाताई बावने यांचा करुण अंत झाला. बाजूलाच असलेला चिमुकला आर्यन सुदैवाने बचावला. गणेश यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हे दाखल केले.(प्रतिनिधी)
चिमुकल्या नातवासह मुलगाही बचावला
By admin | Published: May 11, 2015 2:18 AM