शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

नागपूर: रात्री उशिरापर्यंत बहिणीसोबत केली राखीची तयारी अन् पहाटे केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 11:33 PM

मेरिटच्या विद्यार्थ्याने लावला गळफास - एमआयडीसीतील घटनेने समाजमन सून्न

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: मेरिटचा विद्यार्थी असलेल्या आणि नेहमीच दुरदर्शी विचार मांडणाऱ्या एका युवकाने आई तसेच बहिणीसोबत राखीचा सण आगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी रविवारी पहाटेपर्यंत तयारी केली अन् घरची मंडळी झोपल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. एमआयडीसीतील लक्ष्मी पार्क सुतगिरणी (वाघधरा) परिसरात रविवारी भल्या सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यामुळे समाजमन सून्न झाले. प्रद्यूम्न मयुरेश चेंडके (वय १९) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. प्रद्यूम्न अभ्यासात अत्यंत हुशार होता. त्याने मेरिटचे गुण मिळवत सीए (फॉउंडेशन)चा अभ्यासक्रम केला होता. त्याचे वडिल घरातच स्टेशनरी मार्ट चालवितात तर आई प्राध्यापक आहे. त्याला एक १५ वर्षांची बहिण आहे. सधन कुटुंबातील प्रद्युन्म कुटुंबियांसोबत अन् मित्रांमध्ये दूरदर्शी विचार करणारा म्हणून ओळखला जायचा. त्याने राखीचा सण आगळ्या पद्धतीने साजरा करू, असे म्हणत आई आणि बहिणीसोबत रविवारी पहाटे २.३० पर्यंत घराची साफसफाई केली. त्यानंतर आई, बहिण आणि वडिल झोपल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने रुमचे दार आतून लावून घेत आत्महत्या केली. 

गळफास लावल्यानंतर काही तरी पडल्यासारखे झाल्याने घरच्यांना जाग आली. त्यामुळे त्यांनी प्रद्युम्नच्या रूमच्या दाराजवळ येऊन बघितले. त्याने दारासमोर एक चिठ्ठी ठेवली होती. त्यात त्याने हा दरवाजा आतून बंद आहे. मागचे दार उघडे आहे, असे इंग्रजीत लिहून ठेवले होते. परिणामी घरच्यांनी बाजुच्या गल्लीतून डोकावून बघितले तेव्हा प्रद्युम्न गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. आरडाओरड करीत त्यांनी त्याला खाली उतरवले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसीचे पीएसआय ठाकूर आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धावले. चौकशीनंतर त्यांनी मयूरेश मोहन चेंडके (वय ४७) यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली. प्रद्युम्नने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.

बहिणीचा आक्रोश, शेजारीही हळहळले

पहाटेपर्यंत राखीसोबतच बहिणीचे लग्न धुमधडाक्यात करण्याची गोष्ट करणाऱ्या प्रद्यम्नने अशा पद्धतीने घरच्यांशी कायमचे नाते तोडल्याने चेंडके कुटुंबियांना जबर मानसिक धक्का बसला आहे. त्याची छोटी बहिण राखी घेऊनच आक्रोश करत होती. तर, तिची अवस्था पाहून आजुबाजुच्या मंडळींनाही शोक अनावर झाला होता.

गळफास लावून आत्महत्या

नागपूर - भूषण भास्कर सरोदे (वय ४१, रा.संत लहानुजीनगर, जरीपटका) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मिलींद भास्कर सरोदे (वय४८) यांनी दिलेल्या माहितीवरून जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRaksha Bandhanरक्षाबंधनnagpurनागपूर