लाेकमत न्यूज नेटवर्क
बाजारगाव : रंग खेळणे आटाेपल्यानंतर गावातील काही समवयस्क मुले गावालगतच्या तलावात आंघाेळ करण्यासाठी गेली. यातील एकाचा पाेहताना तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना काेंढाळी (ता. काटाेल) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील बाजारगाव येथे साेमवारी (दि. २९) दुपारी घडली.
प्रतीक तेजराम सोनटक्के (१५, रा. बाजारगाव, ता. नागपूर ग्रामीण) असे मृत मुलाचे नाव आहे. साेमवारी धूलिवंदन असल्याने प्रतीक त्याच्या समवयस्क मित्रांसाेबत रंग खेळला. त्यानंतर ताे मित्रांसाेबतच गावालगतच्या तलावात पाेहायला गेला. बराच उशीर हाेऊनही प्रतीक घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याची चाैकशी करीत शाेध घ्यायला सुरुवात केली. ताे तलावाच्या दिशेने गेला असल्याची माहिती काहींनी त्याच्या कुटुंबीयांना दिली. एवढे करूनही ताे कुठेही न गवसल्याने त्याचा भाऊ जय याने मंगळवारी (दि. ३०) सकाळी ताे बेपत्ता असल्याची पाेलिसात तक्रार नाेंदविली.
दरम्यान, पाेलिसांनी सकाळी ११ वाजल्यापासून त्या तलावात शाेधकार्य सुरू केले. काही वेळातच तलावात पाेलिसांना प्रतीकचा मृतदेह आढळून आला. पाेलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणी प्रक्रियेसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनवले करीत आहेत. या तलावात आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटना थांबवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने याेग्य उपाययाेजना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.