लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर व्यक्ती कुठल्याही संकटावर सहज मात करू शकतो. अशाच संघर्षातून अनेक व्यक्तिमत्त्व घडले आहेत. ज्यांचा संघर्षच पुढच्या पिढीसाठी एक नवीन प्रेरणा ठरले आहे. असेच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अनिल हिरेखण होत. सध्या ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव आहेत. परंतु इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. रात्री वॉलपेंटिंग करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मिळेल ती कामे केली आणि आपले लक्ष्य साध्य केले. परंतु ते करीत असतानाच आंबेडकरी चळवळीशी मात्र आपले नाते कधीही तुटू दिले नाही, हे विशेष.डॉ. अनिल हिरेखण यांचा जन्म बाभुळखेडा या त्यावेळच्या झोपडपट्टीत झाला. त्यांचे वडील मिल कामगार होते. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांची आईसुद्धा डोक्यावर टोपली घेऊन फळं विकायची. अशा परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण दिले. ते महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांचे वडील सेवानिवृत्त झाले. आर्थिक अडचण आणखीनच वाढली. अशावेळी अनिल हे सकाळी कॉलेज तर रात्री वॉलपेंटिंगचे काम करायचे. लोकमतचे सर्वेअर म्हणूनही त्यांनी काम केले. अशाप्रकारे काम करीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पीएचडी केली. ते आज राष्ट्रसंत तुकडेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव या महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत आहेत.डॉ. अनिल यांचा आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग असतो. ते एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी स्वत: स्वरबद्ध केलेल्या ‘एक भीमाईचा लाल, एक जिजाऊचा लाल’ या नावाने गीतांची एक सीडीसुद्धा काढली आहे. अर्थातच ही गीतेसुद्धा आंबेडकरी चळवळीला साजेशीच अशी आहेत.
प्रेरणादायी! रात्री वॉलपेंटिंग करणारा मुलगा झाला नागपूर विद्यापीठाचा उपकुलसचिव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 7:25 PM
जिद्द, चिकाटी आणि परिश्रम करण्याची तयारी असेल तर व्यक्ती कुठल्याही संकटावर सहज मात करू शकतो. अशाच संघर्षातून अनेक व्यक्तिमत्त्व घडले आहेत. ज्यांचा संघर्षच पुढच्या पिढीसाठी एक नवीन प्रेरणा ठरले आहे. असेच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. अनिल हिरेखण होत. सध्या ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे उपकुलसचिव आहेत. परंतु इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. रात्री वॉलपेंटिंग करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मिळेल ती कामे केली आणि आपले लक्ष्य साध्य केले. परंतु ते करीत असतानाच आंबेडकरी चळवळीशी मात्र आपले नाते कधीही तुटू दिले नाही, हे विशेष.
ठळक मुद्देअनिल हिरेखण यांचा संघर्षमय प्रवास : आंबेडकरी चळवळीतील हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व