शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा बहिष्कार; पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 11:27 AM

Winter Session Maharashtra 2022 : विधान परिषदेच्या कामकाजाला विरोधी पक्षाचे आमदार सहभागी होणार

नागपूर : हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून काल सभागृहात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या विधानावरून उडालेल्या गोंधळानंतर आजचा दिवसदेखील चांगलाच गाजणार असल्याचे चित्र आहे. काल घडलेल्या प्रकारानंतर आमदार जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन कालावधीपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांनतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. विरोधी पक्षाचे आमदार आक्रमक झाले असून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

कर्नाटक सरकारचा निषेध करतानाच आमदार जयंत पाटील यांच्यावर झालेल्या कारवाई संदर्भात आज महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले असून सभागृहात न जाता पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना म्हणाले,जयंत पाटील यांचे निलंबन मागे घेत त्यांना सभागृहात बसू द्यावे, अशी आमची मागणी आहे. मात्र, ती मान्य होत नसल्याने आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. 

काल ज्येष्ठ नेते व आमदार जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईचा निषेध करत महाविकास आघाडीने गुरुवारी सभात्याग केला होता. तीच भूमिका कायम ठेवत आज शुक्रवारी विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला. त्यांचं निलंबन मागे घेण्यात यावं ही आमची मागणी असून विधानसभेच्या कामकाजावर आम्ही बहिष्कार टाकला आहे, असे अजित पवार म्हणाले. जयंत पाटील यांना अडकविण्यासाठी राजकारण करून चित्र रंगवण्यात आलं असल्याचे पवार म्हणाले. तर, कर्नाटक सरकार महाराष्ट्राला एकही इंच जागा न देण्याचा ठराव करत आहे. आता तरी आपल्या सरकारने सीमावादावर ठराव आणावा. आमचा त्याला विरोध राहणार नाही.' असं जितेंद्र आव्हाड म्हणाले,

एयू म्हणजे अनन्या उदास

सत्तापक्ष गैरसमज पसरवित आहे. काल एयू वरून त्यांनी गदारोळ केला. वास्तविक पाहता रिया चक्रवर्तीने स्वतः एयू म्हणजे अनन्या उदास हे स्पष्ट केले आहे. अनन्या ही माझी मैत्रिण आहे, हे आता स्पष्ट झाले आहे,' असे अजित पवार म्हणाले. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी बसवून सरकार ३२ वर्षीय तरुणाला किती घाबरले आहे, हे दिसून आल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

सरकारचे 'सत्तामेव जयते'

आम्ही सत्यमेव जयते हे तत्व मानणारे आहोत तर सरकार सत्तामेव जयते मानते. सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दबणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. 

लोकशाहीसाठी काळा दिवस

जयंत पाटील यांचे निलंबन लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. कर्नाटक सरकार कुरघोडी करत असताना आपले सरकार काहीच करत नसल्याचा खेददेखील त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMahavikas Aghadiमहाविकास आघाडी